शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची ४३ पदे व्यपगत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:19 IST

८५ पैकी फक्त १७ शिक्षकांचे झाले समायोजन

ठळक मुद्दे जिल्ह्यात ८५ शिक्षक अतिरिक्त ठरली १७ शिक्षकांना शाळांनी समायोजन करून घेतले२५ शिक्षकांची न्यायालयात धाव

आॅनलाइन लोकमतधुळे : संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनांतर्गत रूजू करून न घेतलेल्या शाळेतील पदे व्यपगत करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील ४३ शिक्षकांचे पदे व्यपगत करण्यात येणार आहे.जिल्ह्यात ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले होते. त्यांचे ५५ शाळांमध्ये आॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया झालेली होती.  अतिरिक्त शिक्षकांना समावून घ्यावे यासाठी शिक्षणाधिकाºयांनी  डिसेंबर २०१७ मध्ये संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी  फक्त १७ शिक्षकांना आपल्या शाळेत समावून घेतलेले आहे.  उर्वरित शिक्षकांना शाळांमध्ये समावून घेण्यात आलेले नाही.या संदर्भात शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दोनवेळा मुख्याध्यापक व संस्था चालकांची बैठक घेऊन, अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेतल्यास मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केले जाईल असा इशारा दिला होता. दरम्यान मुदत उलटूनही मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ चे वेतन स्थगित करण्यात आले होते. तरीही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटलाच नाही.दरम्यान पाठपुरावा करूनही शाळा संबंधित शिक्षकांना रुजू करून घेत नसतील तर अशा शाळांमधील पदे संच मान्यता २०१७-१८ करतांना व्यपगत करण्यात कार्यवाही करावयाची असल्याचे शिक्षण संचालक गंगाथर म्हमाणे यांनी राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.जिल्ह्यातील ८५ पैकी फक्त १७ शिक्षकांना शाळांनी हजर करून घेतले आहे. उर्वरित ६८ शिक्षकांना शाळांनी समावून घेतले नाही. या ६८ पैकी २५ शिक्षक न्यायालयात गेल्याने, ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आता उर्वरित ४३ माध्यमिक शिक्षकांची पदे या निर्णयानुसार व्यपगत होणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी दिली. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक