शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 17:49 IST

तीनजण जखमी रुग्णालयात, पोलीस दप्तरी नोंद, व्यक्त झाली हळहळ

धुळे : जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.ट्रालाच्या धडकेत आजोबा ठार, नातू जखमीचांदवड तालुक्यातील दलगाव येथील राजाराम तानाजी नरोटो (७९) व सचिन आनंद हालनोर (वय २१) हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १५- ईडब्ल्यु ५३०९) धुळ्याकडून पारोळ्याकडे जात होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणा?्या ट्रालाने (क्र. जीजे ११-टीटी ८०९९) दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत राजाराम नरोटे हे जागीच ठार झाले. तर सचिन हालनोर हा जखमी झाला. हा अपघात २७ फेबु्वारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कासविहीर शिवारात झाला. याप्रकरणी शांताराम नरोटे यांनी दिलेल्या फियार्दीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये ट्राला चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दुचाकी घसरल्याने एकजण ठार एकजण जखमीधुळ्यातील मोहाडी उपनगरातील संतोष एकनाथ चौधरी (वय ४०, रा. मोहाडी उपनगर) व किशोर बबन चौधरी (रा. पाटण, ता.चाळीसगाव) हे दुचाकीने (क्र.एमएच १९-डीआर ७२३७) जात असतांना फागणे गावाच्या अलीकडे दुचाकी घसरली. त्यात संतोष चौधरी खाली पडले. त्यांना मार लागल्याने, त्यांचा मृत्यू झाला. तर किशोर चौधरी जखमी झाले. हा अपघात २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या फियार्दीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनला किशोर चौधरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.एस. काळे करीत आहेत.रिक्षा-दुचाकी अपघातात एकजण ठारशिंदखेडा तालुक्यातील रोहोड फाट्याजवळ रिक्षा-दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी झाली. त्या अपघाताची नोंद २७ रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनला करण्यात आली. महेश छोटालाल शर्मा (रा. इटावा, मध्यप्रदेश, ह.मु.चिमठाणे, ता. शिंदखेडा) हे दुचाकीने फर्निचरचे लाकूड पाहण्यासाठी जात असतांना रोहोड फाट्याजवळ समोरून येणा?्या मालवाहू रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश शर्मा हे ठार झाले. याप्रकरणी रामप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस स्टेशनला मालवाहू रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल आर.एम. माळी करीत आहेत.दोन दुचाकींच्या धडकेत एकजण ठारदोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धहकेत एकजण ठार व एकजण जखमी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील शिवाजीनगर फाट्याजवळ २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. भरत विष्णू पाटील (४०, रा. मोरशेवडी, ता. धुळे, ह.मु. खापर, ता. अक्कलकुवा) हे दुचाकीने (क्र. एमएच ३९-एए ९४४१) जात असतांना शिवाजीनगरच्या पुढे मागून येणा?्या दुचाकीने (एमएच १८-ए ९२५७) जोरदार धडक दिली. यात भरत पाटील व जीजाबाई पाटील हे खाली पडले. त्यात भरत पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रभाकर देवरे (रा. बोरीस) यांनी दिलेल्या फियार्दीवरून निजामपूर पोलीस स्टेशलना दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे