शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पोलीस अधिकाºयांची ३५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:28 IST

धुळे जिल्हा : कर्मचाºयांवर पडतोय ताण, पाठपुराव्याची आवश्यकता

ठळक मुद्देकामांचा जाणवणारा ताण लक्षात घेता रिक्त पदांकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज

देवेंद्र पाठक। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांचे पुरेशाप्रमाणात संख्याबळ असणे गरजेचे आहे. परंतु जिल्ह्यात  ३५ पोलीस अधिकाºयांची पदे रिक्त आहे. त्याचा ताण इतर कर्मचाºयांवर पडतो़  पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे़ धुळे जिल्हा हा गुजरात-मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून  गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. चोºयांसह किरकोळ कारणावरून हाणामाºयांचे प्रमाणही वाढत  आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनावर गुन्ह्यांच्या शोध कामी ताण वाढत आहे़ हा ताण कमी करण्यासाठी अधिकाºयांसह पोलिसांची रिक्त पदे तातडीने भरल्यास कामाची विभागणी होऊन ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ जिल्ह्यात पोलिस कर्मचाºयांच्या १ हजार ८५१ पदांना मंजूरी आहे़ यापैकी केवळ २५ पदे आजही रिक्तच आहे़ ती भरण्यासाठी प्रशासकीय पाठपुरावा गरजेचा आहे़ याशिवाय जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि पाच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची पदे नियमित भरण्यात आलेली असल्याने ती रिक्त नाहीत़ पोलीस निरीक्षकांची १८ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षकांची २७ पदे मंजूर असून पैकी ६ पदे रिक्त आहेत़ पोलीस उपनिरीक्षकांच्या ९० पदांना मंजूरी आहे़ असे असलेतरी त्यात २८ पदे आजही रिक्तच आहेत़ असे एकूण १४२ अधिकाºयांच्या पदांना मंजूरी आहे़ मात्र त्यापैकी ३५ पदे रिक्तच आहेत़ रिक्त पदे त्वरीत भरण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.