शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पटेल परिवाराकडून मृतांच्या वारसांना ६० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:04 IST

शिरपूर : मृत व जखमींच्या कुटुंबांना ३ महिन्यांचा किराणा माल भरुन देणार

शिरपूर :  तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल्स फॅक्टरीच्या स्फोटात १३ ठार तर ७२ जण जखमी झाले आहेत़ धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून आमदार अमरिशभाई पटेल यांनी मृतांना प्रत्येकी ५० हजार व उद्योगपती तपनभाई पटेल यांनी १० हजार असे ६० हजार रूपयांची मदत पटेल परिवाराकडून जाहिर करून मृत व जखमींच्या परिवाराला ३ महिने पुरेल एवढा किराणा माल देण्याचे जाहिर केले़घटनेचे वृत्त आमदार अमरिशभाई पटेल यांना समजल्यावर त्यांनी तातडीने शासकीय अधिकाºयांशी संपर्क साधून मदत कार्य करण्याचे कळविले़ त्यांनीही १ रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची आस्थेवाईक चौकशी केली़ २ रोजी सकाळी १० वाजता येथील नपाच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल व उपजिल्हा रूग्णालयातील जखमींना भेट घेवून घटनेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहेत़ त्यानंतर घटनास्थळी भेट देणार आहेत़ या घटनेत मृत पावलेल्या १३ जणांना प्रत्येकी पटेल परिवाराकडून ५० हजार रूपये दिले जाणार आहेत़ तसेच यापूर्वी उद्योगपती तपनभाई पटेल यांनी मृतांना प्रत्येकी १० हजार रूपये देण्याचे जाहिर केले आहे़ तसेच मृत व जखमींच्या परिवाराला ३ महिने पुरेल एवढा किराणा माल व धान्याचा साठा पुरविणार आहेत़ या घटनेत २ मुले अनाथ झाले आहेत़ याशिवाय अजून काही मुले अनाथ झाले असतील असे सर्वांचे शिक्षण, कपडे, राहण्याची व जेवणाची सोय असा सर्व खर्च पटेल परिवाराकडून केला जाणार आहे़आमदार अमरिशभाई पटेल यांनी सांगितले की, सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे़ तालुक्याने अशी धकादायक घटना कधी बघितली नव्हती़ मृत व जखमींना सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़तसेच संबंधित कंपनीने मृत व जखमींना मदत केली नाही तर ते कोर्टात जाण्यासाठी लागणारा सर्व खर्च पटेल परिवाराकडून केला जाणार असल्याचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले़ उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी देखील जिल्हा रूग्णालयासह येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून घटनास्थळाची पहाणी केली़

टॅग्स :Dhuleधुळे