शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कापडणे येथे १२०० विद्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:31 IST

जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात : जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयात प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.कापडणे येथे उत्साहकापडणे- गावातील सर्व माध्यमिक शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला.पतंजलि किसान सेवा समिती व भारत स्वाभिमान न्यास, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एच.एस. बोरसे हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी एच.एस. बोरसे हायस्कुलचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील, आदर्श कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उषा पाटील, नुतन माध्यमिक हायस्कुलचे शिक्षक संतोष एंडाईत, बोरसे हायस्कुलचे पर्यवेक्षक व्ही.एस. देसले, कोषाध्यक्ष अरूण विभांडीक, योगशिक्षक योगेश अत्रेय आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी एस.एस. खलाने, डी.व्ही. पाटील, डी.टी. पाटील, आर.सी. पाटील, वाय.ए. दाभाडे, स्नेहल पाटील, ए.एस. भामरे, एम.बी. पाटील, आर.सी. पाटील, आर.डी. पाटील, एम.ए. गुलदगड, आर.के. पाटील, एम.पी. पाटील, जिजाबराव माळी, बी.एन. पाटील, एम.ए. पाटील, ए.डी. पाटील, डी.पी. माळी, के.एल. ठाकरे, पी.सी. धनगर, व्ही.आर. माळी, जी.वाय. जगताप, डी.डी. सोनवणे, एन.एस. माळी व सर्व विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.पतंजली किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी तथा योग शिक्षक योगेश अत्रेय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग व सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सूर्यनमस्कारातील १२ आसनांसह विद्यार्थ्यांसाठी उंची वाढण्यासाठीची आसने ताडासन, तिर्यक ताडासन,पश्चिमोत्तानासन तसेच एकाग्रतेसाठीची अन्य आसने व प्राणायामांमध्ये भस्त्रिका, कपालभाती, बाह्यप्राणायाम, ध्यान आदी प्राणायामांचा अभ्यासही विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आला. प्रशिक्षणाअगोदर रॅली काढून जनजागृती करण्यात आली.एच.एस. बोरसे हायस्कुलचे मुख्याध्यापक आर.एस. पाटील, पतंजलीचे जिल्हा कोषाध्यक्ष अरूण विभांडीक यांनी योगाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी केले. मंचावर भूमि महेश सोनार, संजना धनंजय कुंभार, जोगेश्वरी अरूण जैन, नेहा मुनिराज माळी, वैभव शांताराम खैरनार, चंद्रशेखर प्रकाश पाटील, प्रशांत उमाकांत खलाने या विद्यार्थ्यांनी आसनांचे सादरीकरण केले.पिंपळनेर महाविद्यालयपिंपळनेर- येथील कर्म. आ.मा. पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.एस.टी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी योगशिक्षक प्रा.वाय.एम. नांद्रे यांनी सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सुर्यनमस्काराचे प्रशिक्षण घेतले. प्रा.डॉ. राम पेटारे यांनी प्रास्ताविकातून सुर्यनमस्काराचे फायदे विशद केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.बी.सी. मोरे, प्रा.डॉ.एस.पी. खोडके, प्रा.डॉ.डब्ल्यू.बी. शिरसाठ, प्रा.के.डी. कदम, प्रा.एस.के. काकड यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.रावेर माध्यमिक विद्यालयदत्तवायपूर- धुळे तालुक्यातील रावेर येथील कै.भा.सु. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सूर्यनमस्कार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी योगशिक्षिका सुरेखा पाटील, क्रीडा भारतीच्या योग शिक्षिका सारिका पाटील यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींना सूर्यनमस्कार, योगासनांचे प्रात्यक्षिक करून सूर्यनमस्कार व योगासनाचे फायदे विशद केले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार व योगासने केली.यावेळी मुख्याध्यापक सी.एन. शेवाळे, एस.वाय. पाटील, के.एम. देवरे, बी.आर. देवरे, एच.एस. शिरसाठ, व्ही.एन. पाटील, व्ही.आर पाटील, एम.आर. महाले, वाय.एस. पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.कलमाडी माध्यमिक विद्यालयदत्तवायपूर- शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले. यावेळी मुख्याध्यापक एस.ए. कदम यांनी योग, सूर्यनमस्काराविषयी मार्गदर्शन केले.क्रीडा शिक्षक सी.जी. वारूडे यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पी.आर. पाटील, जे.डी. चव्हाण, के.एस. सनेर, एस.बी. भदाणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे