सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर येथे प्रमुखस्वामी महाराज व शास्त्री महाराज यांनी वारंवार विचरन केले. तसेच श्री स्वामीनारायम यांचे मोठ्या संख्येने भक्तगण असल्याने येथील स्वामीनारायण संस्थेस गुजराथ राज्यातील सारंगपूर येथील सुमारे १५० संतांनी बुधवारी सायंकाळी भेट दिली. संतांच्या आगमनाने सोनगीर गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. स्वागतासाठी गावकऱ्यांनी अंगणात रांगोळ्या व दीप लावले. तसेच घरावर गुढी उभारून संतांचे पुष्पवृष्टी करीत ढोलताशाच्या धडाक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत केले.सारंगपूर (गुजराथ) श्री स्वामीनारायण संतांचे प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्याठिकाणी स्वामीनारायण मंदिरे आहेत त्याठिकाणी पंचतीर्थ दर्शनासाठी संतांना पाठविले जाते. दरम्यान सोनगीर येथे श्री स्वामीनारायण संस्थेस अनेक संतांनी गेल्या काही वर्षांमध्ये भेटी दिल्यात. यात प्रमुखस्वामी महाराज येथे येऊन वारंवार विचरन केले. राधाकृष्ण मंदिरात सभाघेत असत अश्या या पवित्र मंदिराचे याप्रसंगी संतांनी दर्शन घेतले. तसेच श्री कृष्ण मंदिर जवळ असलेल्या विहरीतील पाण्याने प्रमुखस्वामी अंघोळ करायचे अश्या विहिरीचे देखील संतांनी दर्शन घेतले. याप्रसंगी संतांच्या या नगर यात्रा मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्तगण सहभागी झाले होते. या संतामध्ये काही संत हे उच्चशिक्षण घेतलेले संत आहेत. दरम्यान मिरवणूक यशस्वीतेसाठी सत्संग मंडळ सोनगीर व स्वामीनारायण युवक, महिला मंडळ व गुजर समजाने परिश्रम घेतले.
सोनगीरच्या स्वामीनारायण मंदिरास १५० संतांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:24 IST