आजच्या डिजिटल युगात रोज भरमसाट डेटा निर्माण होत आहे आणि या डेटाचे योग्यरीत्या सादरीकरण हे उद्योग व व्यवसायासाठी अतिशय मौल्यवान ठरू शकते आणि ही बाब डेटा व्हिज्युअलायझेशनमुळे अतिशय सोपी झाली आहे. याच्याच अनुषंगाने व व्यवसायात डेटा व्हिज्युअलायझेशनला प्राप्त झालेल्या महत्वाला अनुसरून डिप्लोमा व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा मायक्रोसॉफ्ट टीम या ऑनलाईन व्यासपीठद्वारे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी पदवी व डिप्लोमा महाविद्यालयातून एकूण १३१ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ४१ डिप्लोमा तथा ९० अभियांत्रिकीचे सहभागी होते.
या कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ.नीलेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.साळुंके म्हणाले की, ही २१ व्या शतकातील अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. सध्याच्या संगणक युगात प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये डेटा व्हिज्युअलायझेशनचे महत्त्व त्यांनी नमूद केले़
प्रा.खालिद अल्फात्मी यांनी एक्सेल वापरून डेटा व्हिज्युअलायझेशन करण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.मंगेश बालपांडे यांनी पायथॉन वापरून डेटा व्हिज्युअलायझेशन कसे करावे या बद्दल माहिती दिली. प्रा.आशिष आवटे यांनी टॅबलेवू सॉफ्टवेअरचा वापर करून डेटा व्हिज्युअलायझेशन करण्याच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांना अवगत करून दिल्या. कार्यशाळेच्या अंतिम दिनी प्रा.उमाकांत मांडवकर यांनी विद्यार्थ्यांना टॅबलेवू सॉफ्टवेअर द्वारे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधील विविध केस स्टडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सूत्रसंचालन मानसी कुलकर्णी, श्रद्धा चांगुणे व फाल्गुनी शिंदे तर आभार डॉ.भूषण चौधरी यांनी मानले. कार्यशाळा आयोजनासाठी प्रा.आशिष आवटे, प्रा.उमाकांत मांडवकर व प्रा.मंगेश बालपांडे यांचे सहकार्य लाभले़