‘वाडी’तून १२०० क्यूसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:08 PM2019-09-18T23:08:59+5:302019-09-18T23:09:18+5:30

शिंदखेडा : वाडीशेवाडी मध्यम प्रकल्पात ९५ टक्के तर अमरावती धरणात ९६ टक्के जलसाठा

3 cusecs of water from 'Wadi' | ‘वाडी’तून १२०० क्यूसेक विसर्ग

dhule

Next

शिंदखेडा : तालुक्यात बुराई नदीवरील वाडीशेवाडी मध्यम प्रकल्प व मालपूर येथील अमरावती नदीवरील अमरावती धरण हे दोन्ही प्रकल्प तालुक्यासाठी महत्वपूर्ण प्रकल्प असून आतापर्यंत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. मात्र, यावर्षी वाडी प्रकल्प ९५ टक्के तर अमरावती प्रकल्प ९६ टक्के भरल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. सध्या तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पिकात मोठ्या प्रमाणात पाणी असून पिकाचे नुकसान होत आहे.
तालुक्याला वरदान ठरणारे व ६० टक्के तालुक्याची जीवनदायिनी ठरलेले बुराई नदीवरील वाडीशेवाडी धरण अद्याप भरले नव्हते. ते यावेळी ९५ टक्के भरले आहे. या प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी समुद्र सपाटीपासून २७५.५५ मीटर असून बुधवारी पाणी साठा २७६.३० एवढा म्हणजे ९५.८१ टक्के जलसाठा झाला आहे.
बुराई डॅम १०० टक्के
साक्री तालुक्यातील बुराई डॅम शंभर टक्के भरल्याने त्यातून ८३८ क्यूसेस पाणी सांडव्याद्वारे नदीपात्रातून वाडीशेवाडी धरणात येत असल्याने या धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उचलला असून त्यातून १२०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
अमरावती मध्यम प्रकल्पाची पूर्ण जलाशय पातळी २२५.७० मी. असून १८ रोजी पाणी पातळी २२५.६० मी. इतकी म्हणजे ९६ टक्के झाली आहे. तरी वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास धरणाचे गेट उघडण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.
१० मंडळात सरासरी ओलांडली
यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावत १० मंडळामध्ये सरासरी ओलांडली असून शिंदखेडा व वर्षी मंडळ हजार एम.एम.च्या जवळपास पोहोचण्याच्या मार्गावर आहे. यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: 3 cusecs of water from 'Wadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे