शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील २३ जि.प.शाळा अवघड क्षेत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:27 IST

साक्री तालुक्यातील एकाही गावाचा अवघड क्षेत्रात समावेश नाही

ठळक मुद्देसर्व्हेक्षणानंतर अवघडक्षेत्र निश्चितसर्वाधिक गावे शिरपूर तालुक्यातअवघड क्षेत्रातील गावांना जाण्यास रस्ते नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या संदर्भात सध्या शिक्षण विभागामध्ये तयारी सुरू आहे.  अवघड गावे निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २३ गावातील जि.प.शाळांचा  अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे. यात शिरपूर तालुक्यातील १४, धुळे तालुक्यातील ६, व शिंदखेडा तालुक्यातील ३ गावातील जि.प.शाळांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात एकही गाव अवघड क्षेत्रात नाही.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागाने आता सर्वसाधारणक्षेत्र व अवघड क्षेत्र अशी वर्गवारी केलेली आहे.धुळे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात ३५८६ शिक्षक कार्यरत आहे. अवघड क्षेत्रातील काही गावे दुर्गम क्षेत्रात असून,  या ठिकाणी बसची जाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे शिक्षकांना पायीच जावे लागते.अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी शिक्षण विभागाची नुकतीच बैठक झाली. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकाºयांना, अभियंता यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना केल्या. झालेल्या सर्वेक्षणानुसार  अवघड क्षेत्रातील गावांची यादी चारही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी शिक्षण विभागाला सादर केली. त्यात २३ गावांचा समावेश केला आहे. गेल्यावर्षीही २३ गावांचाच अवघड क्षेत्रात समावेश झालेला होता.या गावातील जि.प.शाळांचा अवघड क्षेत्रात समावेशशिरपूर तालुका- गधडदेव, मालकातर, उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, गुºहाळपाणी, निशानपाणी, रोहीणी, जि.प.शाळा टिटवापाणी चिलारे, जि.प.शाळा खुटमळी चिलारे, जि.प.शाळा पिरपाणी चिलारे, जि.प.शाळा कोईडोकीपाडा सावेर, महादेव-दोंडवाडे.धुळे तालुका- जि.प.शाळा कुसुंबा भिलाली, जि.प.शाळा हिंगणे, जि.प.शाळा बोरीकाठ, जि.प.शाळा रामनगर, जि.प.शाळा मुळप्रतिपाडा, जि.प.शाळा वैतागवाडी-पिंपरखेड. तर शिंदखेडा तालुक्यात देवकानगर, होळकरवाडी, पावसानगर येथील जि.प.शाळांचा समावेश आहे.दरम्यान साक्री तालुक्यातील एकाही जि.प.शाळेचा अवघड क्षेत्रात समावेश नाही.पुरूषांनाच मिळणार अवघड शाळादरम्यान पुरूष शिक्षकांना या अवघड क्षेत्रातील शाळा मिळणार आहे. महिला शिक्षिकेला अवघड शाळा क्षेत्रातून वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली.अवघड क्षेत्रात काम करण्याकडे कलअवघड क्षेत्रातील  गावे मुख्यालयापासून दूर असून दुर्गम भागात आहेत. काही गावातील परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्याठिकाणी शिक्षक जायला तयार नसतात. असे असले तरी अशा गावातील शाळांमध्ये विशेष कामगिरी करू असा काही शिक्षकांना विश्वास असतो. त्यामुळे ते अवघड क्षेत्रातील शाळांची मागणी करीत असतात. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक