लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिरपूरनजिक शेतातील झोपडी वजा घरातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारु आणि साधनासह २ लाख १४ हजार १९० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता करण्यात आली़ याप्रकरणी रामचंद्र भंगी पावरा (२६, रा़ सलईपाडा ता़ शिरपूर) आणि पप्पू सोनार (रा़ शिरपूर) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
शिरपूरला पकडली २ लाखांची दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 12:08 IST