शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

२५ रस्त्यांसाठी १०२ कोटी १० लाख खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:26 IST

सोशल मीडियावरील मेसेज : काम झाले का, तपासण्याचे आवाहन 

धुळे : शहरातील वेगवेगळ्या २५ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे १०२ कोटी १० लाख ९५ हजार ८७४ रुपयांचा निधी खर्च झाला आहे़ त्या रस्त्यांची कामे झाली का ते तपासा अशा आशयाचा मॅसेज गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होता़ परिणामी हा विषय चर्चेत राहिला़ या कामांमध्ये, वाखारकर नगर बोर्ड ते राजेंद्र सुरी नगर बोर्ड, वाडीभोकर रोड, साक्री रोड ते अमरधाम, ३० मीटर रस्ता समता नगर ते निसर्ग उपचार केंद्र, नकाणे रोड सावरकर पुतळा ते नकाणे गाव, चक्करबर्डी रोड ते सुरत बायपास रस्ता, सुरत बायपास ते गुरुद्वारा रस्ता, लेनिन चौक ते धान्य गोदाम पुढे बायपास महामार्ग, इंदिरा गार्डन गिता नगर ते वाडीभोकर रस्ता, श्रीराणा यांचे घर ते लिलाबाई चाळ चितोड नाका रस्ता, ८० फुटी रस्ता नटराज टॉकिज ते वाखारकर नगर, पेठ गल्ली नगरपट्टी ते जमनालाल बजाज रस्ता व गल्ली नंबर नंबर १ ते आग्रा रोड, सुदर्शन कॉलनी ते गणेश नगर, श्री स्वामी नारायण मंदिर ते भगतसिंग नगर ते बायपास महामार्ग, मोगलाई ते ड्रायव्हर सोसायटी ते कब्रस्तान रस्ता, अग्रवाल नगर ते मुंदडा यांचे घर ते जांभळे नर्सरी, वरखेडी रस्ता रामी प्लॉट ते मार्केट रस्ता, यलम्मा माता मंदिर ते नाला रस्ता, हीम हॉटेल ते वृंदावन कॉलनी रस्ता, प्रमोद नगर मधुरम मेडीकल ते अनमोल नगर बोर्ड व भाग्यश्री पिठाची गिरणी ते इंदिरा गार्डन रस्ता, जुने धुळे बर्फ कारखाना ते अ‍ॅक्सिडेशन पाँड, पटाणी पॅलेस ते ओमशांती सोसायटी आणि मोहाडी रेल्वे गेट ते म्हाडा वस्ती रस्ता अशा २५ रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे़ या विविध कामांसाठी कुठे १७ कोटी तर कुठे १५ कोटी, काही ठिकाणी ७ तर काही ठिकाणी ४ कोटी निधीचा समावेश आहे़ बहुसंख्य ठिकाणी १, २, ३ कोटींचा निधी खर्च केलेला आहे़ मोजक्याच रस्ता कामांसाठी लाखांचा निधी दर्शविण्यात आलेला आहे़ अशा २५ विविध रस्ते कामांसाठी तब्बल १०२ कोटी १० लाख ९५ हजार ८७४ रुपयांचा निधीचा समावेश आहे़ या सर्व रस्त्यांची कामे निधीनुसार झाली आहेत का? याची तपासणी धुळेकर नागरीकांनी करावी असे आवाहन देखील त्या मेसेजद्वारे केले जात असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, छत्रपती शिवाजी    महाराज पुतळा ते ८० फुटी रस्ता (वगळला), स्वराज्य प्रतिष्ठान ते हजरत सायरा बानो हायस्कूल रस्ता (वगळला) या दोन रस्त्यांची कामे वगळण्यात आलेली आहेत़

शहरातील रस्तेसंदर्भात लागलीच माहिती देता येऊ शकणार नाही़ कोणते रस्ते झाले, कोणते बाकी आहेत, याची सविस्तर माहिती तपासल्यानंतरच सांगू शकेल, असे आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे