शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात १७ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:52 IST

घर व गोडावूनमध्ये छापा : एलसीबीच्या कारवाईत एकाला अटक

ठळक मुद्देधुळ्यातील घर आणि गोडावूनमध्ये एलसीबीची धाड१७ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्तएक जण पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील भंगार बाजार भागातील अन्सार नगरातील एका घरात आणि ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलनजिक एका गोडावूनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी छापा टाकला़ त्यात गुटख्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १७ लाख ५१ हजार २०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे़ शहरातील आझादनगर भागात असलेल्या अन्सार नगर, भंगार बाजार आणि ऐंशी फुटी रोडवरील एका दुकानात गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना मिळाली़ माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल महेंद्र कापुरे, नथ्थू भामरे, सुनील विंचूरकर, संदिप थोरात, हिरालाल ठाकरे, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, नितीन मोहने, मायूस सोनवणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, तुषार पारधी, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, मनोज पाटील, मनोज बागुल, चेतन कंखरे, विजय सोनवणे, केतन पाटील यांनी छापा टाकला़ भंगार बाजारात असलेल्या अन्सार नगरमधील प्लॉट नंबर ८४ तसेच ऐंशी फुटी रोडवरील एका गोडावूनमध्ये हिरा, रजनीगंधा, विमलनामक गुटखा आढळून आला़ यात विमल गुटखा व जर्दा तंबाखू ही १० लाख ८० हजाराचा आहे़ रजनीगंधा पानमसाला हा ४ लाख ४३ हजार २०० रुपये किंमतीचा आहे़ याशिवाय २ लाख २८ हजार रुपये किंमतीचा हिरा गुटखा व जर्दा तंबाखू  असा एकूण १७ लाख ५१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ घर आणि गोडावून हे मोहसीन करीम तांबोळी (३२, रा़ प्लॉट नंबर ८४, अन्सार नगर, भंगार बाजार, धुळे)  याच्या मालकीचे आहे़ परिणामी हा मुद्देमाल त्याचा असल्याची नोंद करण्यात आली आहे़ त्यालाही अटक करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलीस करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा