शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

१७ दिवसातच खुनाचे संशयित आरोपी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:42 IST

अजय कोळी खून प्रकरण : ठोस पुरावा नसताना पोलिसांची कामगिरी

ठळक मुद्देअजय कोळी खून प्रकरणदोन संशयित पोलिसांच्या ताब्यातखुनाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/सोनगीर/शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय कोळी या तरुणाच्या खून प्रकरणी सोनगीर येथील दोन संशयितांना ठोस पुरावा नसतानाही १७ दिवसात जेरबंद करण्यात नरडाणा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, याचा तपास केला जाईल़  शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय उत्तम कोळी (१८) हा तरुण ३१ जुलै रोजी एमएच १८ बीएफ ८९६५ या क्रमांकाच्या दुचाकीने मोबाईल दुरुस्तीसाठी सोनगीरला आला होता़ गावातीलच एकाला सोबत घेऊन त्या तरुणाने सीम कार्डसह मोबाईल दुरुस्तीला दिला़ त्यानंतर सोनगीर फाट्यावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरले़ त्याने त्याच्या मित्राला सोडले आणि घरी निघाला़ मात्र, तो घरी पोहचलाच नाही़ त्यामुळे त्याचा भाऊ जिगर कोळीसह नातलगांनी त्याचा शोध घेतला़ तो सापडत नसल्याने अखेरीस ४ रोजी दुचाकीसह भाऊ बेपत्ता झाल्याची माहिती सोनगीर पोलिसांना देण्यात आली़ शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा रस्तालगत वाघाडी गावाच्या शिवारात वन हद्दीत दुर्गंधी येत असल्याची माहिती एका वन मजुराने सोनगीर पोलिसांना दिली होती़ सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तरुणाच्या मृतदेहावर टाकण्यात आलेले दगड बाजुला करुन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़ सुरुवातीला हे पार्थीव अनोळखी वाटत होते़  परंतु त्याच्याजवळ मिळालेला फोटो आणि कागदपत्रावरुन हरविलेला तरुण अजय कोळीच असल्याचे उघड झाले़ त्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ जिगर कोळी याला बोलावून अजय कोळीची ओळख पटविली होती़ नरडाणा पोलिसात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना अवघ्या १७ दिवसात खुनाचा तपास लावण्यात आला़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़ यांना घेतले ताब्यातमिळालेल्या माहितीनुसार नरडाणा पोलिसांची वेगवेगळी दोन पथके तयार करण्यात आली होती़ या पथकाने सोनगीर, वाघाडी, वालखेडा, चांदगड, वायपूर, सार्वे, मुडी-मांडळ, एमआयडीसी नरडाणा अशा विविध ठिकाणी फिरून मयत तरुणाच्या नातेवाईकांसह मित्रांशी संपर्क साधला़ त्यातून जे संशयित वाटले त्यांच्यावर पाळत ठेवली आणि सोनगीर येथील सुनील भिवसन ठाकरे (२०) आणि त्याचा मित्र विजय आबा भिल (२२) रा़ एकलव्य चौक, सोनगीर या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या या पथकाला यश आले़ असा आहे घटनाक्रम३१ जुलैपासून अजय कोळी हा बेपत्ता होता़ सोनगीर पोलीस स्टेशनला ४ आॅगस्टला हरविल्याची नोंद करण्यात आली होती़ ५ आॅगस्ट रोजी वाघाडी खुर्द शिवारात त्याचा मृतदेह आढळला़ १८ आॅगस्ट रोजी दोन संशयितांना त्यांच्या घरातून जेरबंद केले़यांना रोख पुरस्कारमाहितीच्या आधारावर दोघां संशयितांपर्यंत पोहचल्याबद्दल पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचे कौतूक केले़ विनोद पाटील यांना १ हजार रुपयांचे बक्षिस, प्रशस्तीपत्रक आणि संदिप गावित यांनाही प्रशस्तीपत्रक जाहीर केले़ याशिवाय हेड कॉन्स्टेबल प्रकाश माळी आणि काशिनाथ ठाकरे यांना प्रत्येकी २ हजार रुपये आणि पारीतोषिक जाहीर करण्यात आले़ यासोबतच पथकातील रघुनाथ शिंदे, नागराज महाजन, सचिन सोनवणे, सचिन माळी, शशिकांत कोळी, मनोज बागुल, रामलाल अहिरे यांना प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा