शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयात जलयुक्तची १६२ कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 17:11 IST

लघू सिंचन विभाग : २६७ कामे झाली पूर्ण; जिल्हा परिषदेत आज अधिका-यांची बैठक

ठळक मुद्देजि.प.च्या लघू सिंचन विभागातर्फे २०१७-२०१८ या वर्षात मंजूर ४२९ कामांपैकी ४१९ कामांचे जिओ टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ४२९ कामांवर १६ कोटी ८४ लाख ९ हजाराचा खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या तिसºया टप्प्यात (२०१७-२०१८) जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे ४२९ कामे केली जाणार होती. ही कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. मात्र, जि.प.च्या लघू सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेल्या एकूण ४२९ कामांपैकी १७ जूनपर्यंत २६७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १६२ कामे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.   जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१७-२०१८ या वर्षासाठी जिल्हयात कामे करण्यासाठी ९५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये  जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे ४३१ कामे केली जाणार होती. त्यात  ४२९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या कामांमध्ये नवीन साठवण बंधारे व त्यांची दुरूस्ती  कोल्हापुरी बंधार, पाझर तलाव पुरर्भरण, तलाव दुरूस्ती, गाव तलावातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश होता. दरम्यान, प्रलंबित राहिलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवार, सकाळी ११ वाजता लघू सिंचन विभागाच्या अभियंता व उपअभियंत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाच पोकलॅण्ड मशीन प्राप्त तिसºया टप्प्याचे कामे पूर्ण करण्याचे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, अद्याप जिल्हयातील १६२ कामे ही अद्याप प्रलंबित राहिली आहे. प्रलंबित राहिलेल्या कामांचे कामे सुरू आहे.  जिल्ह्यात प्रलंबित राहिलेल्या नाला खोलीकरणाच्या कामासाठी पाच पोकलॅण्ड मशीन प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसहभागाचे आवाहन नाला खोलीकरणाच्या कामासाठी लोकसहभागातून कामे करणे शक्य असल्याने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच चौथ्या टप्प्यासाठी (२०१८-२०१९) केल्या जाणाºया शिवार फेºया पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे