शिक्षक दिनानिमित्त काराणी ज्ञानदीप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास नॅशनल वर्ल्ड वाॅइड ह्युमन राइट्स असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षा पूजा खडसे, संघटक प्राजक्ता बारशिंगे तसेच हस्ती स्कूल स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, उपाध्यक्षा सुगंधा जैन, शीतल जैन तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय नामजोशी यांनी केले.
हस्ती ग्रुप ऑफ स्कूल पूर्व प्राथमिक विभाग शिक्षिका - कांचन परदेशी, मंजूषा मोरे, मोनाली पवार, संगीता पवार तसेच प्राथमिक विभाग शिक्षिका प्रीती पाठक, गणित शिक्षक प्रवीण माळी, हिंदी शिक्षक संजय मोरे, माध्यमिक विभाग इंग्रजी शिक्षक मंगलसिंग राजपूत, ज्यु. कॉलेज आयटी शिक्षक भूषण दीक्षित, विज्ञान शिक्षक कपिल सोनवणे, संगणक विभागप्रमुख महेश डिगराळे, क्रीडा विभागप्रमुख प्रकाश खंडेराय, प्राथमिक विभाग समन्वयिका समिना बोहरी, समन्वयक श्रीराम मगर व उपप्राचार्या रजिया दाउदी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमास हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.
आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्व शिक्षक - शिक्षिकांचे हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन, व्हाइस चेअरमन दिलीप वाघेला, सचिव माधव बोधवाणी तसेच शालेय संचालक मंडळाचे मान्यवर सदस्य यांनी अभिनंदन व कौतुक केले.
कार्यक्रमास हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.