शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

15 रस्त्यांची कामे 60 टक्के पूर्ण!

By admin | Updated: January 15, 2017 00:43 IST

धुळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मनपातर्फे शहरातील 15 डी़पी़ रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत़

धुळे : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मनपातर्फे शहरातील 15 डी़पी़ रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत़ सदर कामे प्रगतीपथावर असून एकूण 60 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला असून तसा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्यात आला आह़ेराज्य नगरोत्थान सुवर्ण जयंती अभियानांतर्गत मनपाला शासनाकडून 43 कोटी 72 लाख 34 हजार 964 रुपयांचा निधी मंजूर झाला आह़े त्यात 15 डी़पी़रोडसह 16 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ या कामांसाठी राज्य शासनाकडून 15 कोटी 30 लाख रुपयांचा पहिला हप्ता मनपाला प्राप्त झाला असून त्यात रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत़ तर यात 30 टक्के हिस्सा म्हणून मनपाला 13 कोटीरुपये टाकावे लागणार आहेत़ सदर योजनेत शंभर फुटी रस्ता, पारोळारोड ते वडजाईरोड, अरिहंत मंगल कार्यालयालगतचा रस्ता, नवनाथनगर ते कबीरगंजरोड, मालेगावरोड ते चाळीसगावरोड, भरतनगर ते मोतीरामनगर, विनोदनगर ते वाडीभोकररोड, तहसील कार्यालय ते संतोषीमाता चौक, गांधी पुतळा ते गणपती मंदिर-शिवतीर्थ रस्ता, साक्री रोडवर सिंचन भवनाच्या पाठीमागील सव्र्हे क्रमांक 439 ते महामार्गालगतचा रस्ता, सव्र्हे क्रमांक 49 ते 89 जगदीश देवपूरकर यांच्या घरासमोरील रस्ता, सुशीनाला ते वाडीभोकर रस्ता, एकवीरादेवी मंदिर ते सुशी नाला रस्ता, साक्रीरोड ते सुरत-नागपूर महामार्ग, दत्त मंदिर ते स्वामिनारायण मंदिरार्पयत रस्ता या रस्त्यांचा समावेश आह़े मात्र, सदर योजनेत प्रस्तावित स्वामिनारायण रस्त्यावरील जमीन अधिग्रहणामुळे वाद उद्भविला होता़  तसेच शंभर फुटी रस्त्याचा विषय वादग्रस्त ठरल्याने तो न्यायप्रविष्ट झाला होता़ दरम्यानही अजूनही काही प्रस्तावित रस्त्यांलगतचे अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने कामे सुरू झालेली नाहीत़ चाळीसगावरोड ते महामार्गार्पयतच्या शंभर फुटी डी.पी. रोडवर 20 ते 22 नागरिकांची पत्र्याची घरे असून 90 टक्के घरांच्या कुंपणभिंती अतिक्रमणात आहेत़ पत्र्यांची घरे काढण्यापूर्वी संबंधित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़ नगरोत्थान अभियानांतर्गत राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्यातील 15 कोटी 30 लाख रुपये, मनपा हिश्यातील 2 कोटी 12 लाख रुपये असे मिळून 17 कोटी 42 लाख रुपयांपैकी सद्य:स्थितीत रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 98 लाख रुपयांचा खर्च झाला आह़े एकूण 11़84 कि़मी़चे रस्ते तयार केले जाणार आहेत़ त्यापैकी 2 कि़मी़र्पयत काम झाले आहे तर दोन्ही बाजूला गटारी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची कामे 3़5 कि़मी़र्पयत झाली आहेत़ सदर योजनेतील रस्त्यांच्या कामांच्या निविदा उघडण्यास नगरपालिका संचालनालयाने स्थगिती दिली होती, मनपा हिस्सा टाकण्याचे काय प्रयोजन, अशी विचारणा त्या वेळी मनपाला झाला होती़ दरम्यान, मनपा प्रशासनाने नगरोत्थान योजनेत समाविष्ट रस्त्यांच्या कामांसाठी दोन लाख रुपये रोज स्वतंत्र खात्यात जमा करणार असल्याचे स्पष्ट केले होत़े त्यानुसार दररोज दोन लाख रुपये या योजनेसाठी स्वतंत्र खात्यात ठेवले जात असून त्यातून 13 कोटींचा मनपा हिस्सा टाकला जाणार आह़ेमंत्रालयात नुकतीच बैठक मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक झाली होती, त्यात 136 कोटींची पाणी योजना, घरकूल योजना, राज्य नगरोत्थान योजना, स्वच्छ सव्रेक्षण यासारख्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला होता़ त्यानुसार मनपाने राज्य नगरोत्थान योजनेची सद्य:स्थिती कळविली असून त्यामुळे पुढील हप्ता लवकरच मनपाला मिळू शकतो़ त्यात प्रस्तावित रस्त्यांवर गटारी, फुटपाथ, एलईडी दिवे बसविले जातील़ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या पाठपुराव्याने सदर योजनेसाठी निधी मंजूर झाला आह़े