शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

१३२ कोटीची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:51 IST

महापालिका : स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय; शहरातील पाणीप्रश्न सुटणार

धुळे : शहरासाठी केंद्र सरकारच्या युआरडीए योजनेतून १३२ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली. या योजनेचे काम करतांना वादग्रस्त ठरलेल्या पालघर येथील आर.ए.घुले या ठेकेदाराच पुन्हा शहरासाठी शासनाने मंजुर केलेल्या अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलवाहिनी पाणी योजनेचे काम देण्याचा निर्णय स्थायी समितीत आज घेणाऱ्यात आला.आर.ए.घुले यांनी योजनेच्या कामासाठी १४. ४९ टक्के जादा दराची निविदा भरून १३६ कोटी ६७ लाख ८४ हजार ७१६ रूपयांचा भरलेल्या ठेक्याला सर्वांनुमत्गो मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत सात ते आठ टक्के जादा दराच्या निविदांना मंजुरी दिली गेलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून शहरासाठी गेल्या महिन्यात ११९ कोटी रूपयांची अक्कलपाडा प्रकल्पातून हनुमान टेकडीपर्यंत पाईपाद्वारे पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली.प्रशासकीय मान्यतेनंतर योजनेसाठी लागणाऱ्या पाईपाच्या किंमती वाढल्याने व त्याचा पुरवठा करणाºया विशिष्टच कंपन्या असल्याने योजनेसाठी ई टेडरिंग पध्दतीने निविदा मागण्यात आल्या होत्या. योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून केले जाणार आहे. निविदा भरण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती.मात्र दोनच निविदा आल्याने एक दिवसाने मुदत वाढविण्यात आली होती. मात्र तीही दोनच निविदा असल्याने त्या आज उघडण्यात आल्यात. त्यात पालघर येथील आर.ए.घुले यांनी १४.४९ टक्के जादा दरोने १३६ कोटी ६७ लाख ८४ हजार ६१६ रूपयांची निविदा भरली तर पुणे येथील तेजस कन्सट्रॅक्शन अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिने ३३.९० टक्के जादा दराची म्हणजे १५९ कोटी ८५ लाख १ हजार ८२१ रूपयांची निविदा भरली होती. या निविदा मंजुरीसाठी आज स्थायी समितीसमोर ठेवण्यात आल्यात.यावेळी सभापती युवराज पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ ,जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता एस.सी. निकम, उपअभियंता एन.के.सुर्यवंशी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. त्यात सर्वांनुमते आर.ए.घुले यांची निविदा मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापतीकडून जाहिर करण्यात आले. सभेत सुभाष जगताप, संतोष खताळ, अमिन पटेल, नागसेन बोरसे यांनी चर्चेत भाग घेतला.याप्रसंगी सुरेखा उगले, काशिश उदासी, विमल पाटील, रावसाहेब पाटील, लक्ष्मी बागुल, सुरेखा देवरे, संजय भिल, मन्सुरी मुख्तार कासीम, शेक शाहजहानबी बिस्मिलल्ला, सईदा अन्सारी आदी सदस्य उपस्थित होते. योजनेला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी देण्यात आली.निवडणुकीत दिलेला शब्द पाळणाºयात आल्याबद्दल नगरसेवक नागसेन बोरसे व सभापतींनी समाधान व्यक्त केले. योजना केंद्रपुरस्कृत असून५० टक्के केंद्रातर तर प्रत्येकी २५ टक्के रक्कम ही राज्य सरकार व महापालिकेची असणार आहे. दरम्यान, यासाठी दोनदा स्थायी समितीची सभा स्थगित करण्यात आली होती. शनिवारी निविदा उघडण्यात अडचण आल्याने व आज सकाळी तुलनात्मक अहवाल तयार नसल्याने सभा तहकूब करून ती मंगळवारी घेण्यात आली

टॅग्स :Dhuleधुळे