कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाचे ११ नोडल अधिकारी जिल्हा प्रशासन : जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:19+5:302021-04-10T04:35:19+5:30

अधिकाऱ्याचे नाव आणि सोपवलेली जबाबदारी पुढीलप्रमाणे : भूसंपादन उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई : रेमडेसिव्हर इंजेक्शनसह कोरोनाशी संबंधित सर्व औषधांबाबत आयएमए, ...

11 Nodal Officers of Administration for Corona Control District Administration: Responsibility of Jumbo Covid Center on Supply Officers | कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाचे ११ नोडल अधिकारी जिल्हा प्रशासन : जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाचे ११ नोडल अधिकारी जिल्हा प्रशासन : जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी पुरवठा अधिकाऱ्यांवर

Next

अधिकाऱ्याचे नाव आणि सोपवलेली जबाबदारी पुढीलप्रमाणे : भूसंपादन उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई : रेमडेसिव्हर इंजेक्शनसह कोरोनाशी संबंधित सर्व औषधांबाबत आयएमए, निमा, डेडीकेटेड कोविड हेल`थ सेंटर, कोविड केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालयांशी समन्वय साधणे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण : आरटीपीसीआर, अँटीजन चाचण्यांबाबत खासगी तसेच सरकारी प्रयोगशाळांशी समन्वय साधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तपासणीचे प्रमाण कायम राखणे व प्रलंबित अहवालांबाबत समन्वय व पर्यवेक्षण करणे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ : धुळे शहरात जिल्हा रुग्णालयामध्ये नव्याने सुरु केलेले जम्बो कोविड सेंटर नियंत्रण व पर्यवेक्षण तसेच अचानक तपासणी करणे. भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर : कोविड सेंटर्समधील बेड मॅनेजमेंट, सुविधा तपासण्या, उच्च न्यायालय तसेच शासनाच्या निर्देशांप्रमाणे सुविधा आहेत किंवा कसे याची वेळोवेळी तपासणी करणे, मनुष्यबळ उपलब्धतेवर लक्ष ठेवणे, अचानक तपासणी करणे, सर्व प्रकारचे ऑनलाईन रिपोर्टींग व शासनाच्या पोर्टलवरील रिपोर्टींगची तफावत दूर करणे. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे : सर्व प्रकारचे ऑनलाईन रिपोर्टींग व शासनाच्या पोर्टलवरील रिपोर्टींग यांची तफावत दूर करणे, नोडल अधिकारी व अधिनस्त यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करणे, शासनाच्या आदेशाप्रमाणे ई-व्हीजीट कार्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कर्यालयात सुविधा उपलब्ध करुन देणे. उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील : आपत्कालीन नियंत्रण कक्षात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे, सर्व नगर परिषदा, नगर पंचायती परिसरातील कोविड लसीकरण, कंटेनमेंट झोन, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग याबाबत जनजागृतीसाठी समन्वय साधणे व नियंत्रण ठेवणे. निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे : सर्व बैठका, दूरचित्र परिषदेसाठी माहिती संकलन, पीपीटी, नोट्स अद्ययावत ठेवणे, बैठक व्यवस्था समन्वय व नियोजन करणे, राेहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज : निवासी उपजिल्हाधिकारींशी समन्वय साधून कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाज समन्वय व नियोजन करणे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ : ई-व्हीजीट प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कर्यालयात सुविधा उपलब्ध करुन देणे, खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या अवाजवी बिलाबद्दल नेमलेल्या समितीचा वेळोवेळी आढावा घेणे व समस्या निराकरण करणे. जिल्हा परिषदेचे अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे : ग्रामीण भागात लसीकरण, कंटेनमेंट झोन, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग याबाबत जनजागृतीसाठी तालुकानिहाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त करुन त्यांच्याशी समन्वय साधणे. संजय गांधी योजनेच्या तहसिलदार आशा गांगुर्डे : कोरोनाच्या अनुषंगाने होणाऱ्या सर्व बैठकांच्या इतिवृत्ताचा मसुदा तपासणी करणे.

Web Title: 11 Nodal Officers of Administration for Corona Control District Administration: Responsibility of Jumbo Covid Center on Supply Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.