शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

महिन्याला १० हजार सिटी स्कॅन ; शासकीय दर नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:35 AM

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येसोबतच सिटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या ...

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येसोबतच सिटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. महिन्याला १० हजार सिटी स्कॅन धुळे शहरात करण्यात येत आहेत. सिटी स्कॅन साठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त दर आकारून सिटी स्कॅन करावे लागत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. शासकीय दरातच सिटी स्कॅन होत असल्याचा दावा रेडिओलॉजिस्ट असोसिएशनने केला आहे. धुळे शहरात खाजगी व रुग्णालयात असलेले १५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. यापूर्वी महिन्याला सरासरी ४ ते ५ हजार सिटी स्कॅन होत होते. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने सिटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे. फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला हे समजत असल्याने एचआर सिटी महत्वाचे मानले जाते.

५० टक्क्यांनी वाढले सिटी स्कॅन एचआरसीटी

धुळे शहरात खाजगी डायग्नोस्टिक सेंटर व खाजगी रुग्णालयात असलेले एकूण १५ डायग्नोस्टिक सेंटर आहेत. कोरोना काळापूर्वी जिल्ह्यात महिन्याला सरासरी चार ते पाच हजार सिटी स्कॅन व्हायचे अशी माहिती मिळाली. मात्र आता एका महिन्यात होणाऱ्या एचआरसीटी स्कॅन ची संख्या ५० टक्क्यांनी वाढली आहे. सध्या एका महिन्यात सरासरी १० हजार सिटी स्कॅन होत आहेत.

प्रतिक्रिया -

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सिटी स्कॅन करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. धुळे शहरातील डायग्नोस्टिक सेंटरमध्ये शासकीय दरानुसारच पैसे आकारले जात आहेत. स्लाइस या प्रकारानुसार प्रत्येक एचआरसीटी चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे जास्त पैसे आकारले जात असल्याचे रुग्णांना वाटत असावे. १६, १६ ते ६४ व ६४ पेक्षा अधिक अशा स्लाइसच्या प्रकारानुसार दर आकारले जात आहेत.

डॉ. राहुल बच्छाव, रेडिओलॉजिस्ट, धुळे

दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाची एचआरसीटी चाचणी केली. इतर शहरात या चाचणीचे २ हजार रुपये घेतले जात आहेत. मात्र धुळ्यात यासाठी २ हजार ५०० रुपये द्यावे लागले. शासनाने लक्ष घालावे.

- पंढरीनाथ पाटील, नातेवाईक

मी काही दिवसांपूर्वी एचआरसीटी चाचणी केली. त्यासाठी मला ३ हजार रुपये द्यावे लागले. रुग्णांची संख्या वाढल्याने जास्त पैसे घेतले जात आहेत. शासनाने कारवाई केली पाहिजे.

- संतोष मराठे, रुग्ण

ग्राफ -

१ ते ८ स्कोर - सौम्य

९ ते १८ स्कोर - माध्यम

१९ ते २५ स्कोर - गंभीर

शून्य स्कोर - नॉर्मल

शासनाने निश्चित केलेले दर -

१६ स्लाइस खालील सिटी स्कॅन - २००० रुपये

१६ ते ६४ स्लाइस सिटी स्कॅन - २५०० रुपये

६४ पेक्षा अधिक स्लाइस सिटी स्कॅन - ३००० रुपये