शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा आवर्तनाचा १०० गावांना फायदा होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:45 IST

२०० दलघफू पाणी  : धुळे, शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटणार

ठळक मुद्देआवर्तनाचा तीन तालुक्यांना फायदा२०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेलबंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदीकाठावर पाणीपुरवठा योजना असलेल्या १०० पेक्षा जास्त गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून लवकरच सुटणाºया आवर्तनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून साक्री तालुक्यातील पुनर्वसित तामसवाडी गावाजवळ असलेल्या बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी किंवा गुरूवारी प्रकल्पातून २०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. तेथे पाणी पोहचले की ते आवर्तनाचे यश मानले जाते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयात पाणी पोहचले की अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविले जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होतो. त्यातील ९० गावे धुळे जिल्ह्यातील तर १०-१५ गावे जळगाव जिल्ह्यातील असतात, असे सूत्रांनी सांगितले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत.   दरवर्षीच होते कसरत अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास सर्वप्रथम नदीपात्रातील बंधाºयांच्या फळ्या काढल्या जातात. या बंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत असते. त्यामुळे बंधाºयातील फळ्या काढण्यासाठी मोठी  कसरत करावी लागते.