भूम - देशातील मागासवर्गीय समाजावर हाेत असलेल्या अन्याय, अत्याचाराविराेधात तरुणांनी एकत्र येऊन पँथरच्या माध्यमातून संघर्ष करावा, असे आवाहन ऑल इंडिया पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले.
भूम शहरातील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ऑल इंडिया पँथरचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर ॲड. हृदयानंद सुकाळे, मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे आसिफ जमादार, एल. टी. शिंदे, वंचित आघाडीच्या कमलताई गवळी, समाजरत्न लोमटे, राजू माने, राजू साठे, पल्लू काळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
केदार म्हणाले, राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने तातडीने पावले उचलून दिलासा द्यावा, अन्यथा पँथर सेना रस्त्यावर उतरून जनआंदाेलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणूक दलित, मुस्लिम व ओबीसी यांची माेट बांधून लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, यावेळी दीपक केदार यांनी चंद्रमणी गायकवाड यांची ऑल इंडिया पँथर सेनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर तालुक्यातील पाथरूड, वारेवडगाव, घाटनांदूर व हिवरा या गावांत पँथर सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. संवाद मेळाव्यास पँथरचे प्रदेश अध्यक्ष विनोद भोळे, जिल्हाध्यक्ष अशोक कसबे, शहर अध्यक्ष धनंजय अनसुंडे, भैयासाहेब वाघमारे, वाशी तालुका अध्यक्ष धीरज शिंदे, भूम तालुका अध्यक्ष संदीप सरवदे, शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन शिंदे, मनोज शिंदे, अमोल शिंदे, अजय गायकवाड, राहुल शिंदे, पंकज चौधरी, राज गायकवाड, चिराग गायकवाड, अज्जू वाघमारे, यश गायकवाड, सायरन गायकवाड, आकाश कोरडे, पंचशील गायकवाड, अजय भोसले, नितीन शिंदे, आदी उपस्थित हाेते.