शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण; धाराशिव जिल्हा कचेरीवर धडकलं पिवळं वादळ

By बाबुराव चव्हाण | Updated: November 30, 2023 18:02 IST

समाजबांधव मेंढरांसह माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी झाले हाेते.

धाराशिव: जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी माेर्चा काढण्यात आला. 

समाजबांधव मेंढरांसह माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी झाले हाेते.धनगर समाजाच्या माेर्चाला गुरूवारी दुपारच्या सुमारास शहरातील लेडीज क्लब मैदानावरून सुरूवात झाली. यानंतर हा माेर्चा संत गाडगेबाबा चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, लहुजी वस्ताद साळवे चाैक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करावे, प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या लहान मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळणधाराशिव शहरातील लेडीज क्लब मैदानातून धनगरी ढाेलांचा निनाद आणि भंडाऱ्याची उधळण करून माेर्चाला सुरूवात करण्यात आली. या माेर्चामध्ये धनगर बांधव आपली मेंढरं साेबत घेऊन आले हाेते. जाेपर्यंत एसटीचं आरक्षण मिळत नाही, ताेवर हा लढा सुरूच राहील, असे यावेळी समाजबांधवांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणOsmanabadउस्मानाबाद