उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा जिल्ह्यात माेठा वर्ग आहे. त्यांचे विचार तसेच राज्य सरकारकडून करण्यात येत असलेली विकासकामे जनतेपर्यंत पाेहाेचून पक्षवाढीसाठी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले.
जिल्हा परिषद, नगर परिषदा तसेच नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक ठेवण्यात आली हाेती. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, प्रदेश सचिव सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, संपत डोके, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ. प्रतापसिंह पाटील, महेंद्र धुरगुडे, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा मगर, अशोक जाधव, जिल्हा उपाध्यक्ष वाजीद पठाण यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेऊ घातल्या आहेत. त्यामुळे आतापासून गावस्तरावर बुथ कमिट्या स्थापना करण्यास सुरुवात करावी. एवढ्यावरच न थांबता गाव तेथे शाखा स्थापण्यावरही प्रत्येक पदाधिकाऱ्याने भर द्यावा. या माध्यमातून संघटनात्मक जाळे निर्माण केल्यास हाेऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच राज्यात अव्वल स्थान पटकावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस जगदीश पाटील जिल्हा कोषाध्यक्ष, तुषार वाघमारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, गौस तांबोळी जिल्हा सचिव, सतीश एकंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, सचिन तावडे उस्मानाबाद शहर कार्याध्यक्ष उस्मानाबाद, श्याम घोगरे तालुका अध्यक्ष उस्मानाबाद, दत्ता इंगळे जिल्हा चिटणीस, मुस्ताक कुरेशी जिल्हा सरचिटणीस, इलियास पिरजादे, सुनंदा भोसले सा.न्याय वि. जिल्हाध्यक्ष विवेक घोगरे, सईद काझी, उत्तमराव लोमटे, राजकुमार भगत, संजय पाटील,, अमर चोपदार शहराध्यक्ष तुळजापूर, सचिन कदम जिल्हा उपाध्यक्ष युवक, विवेक शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष, शेख तोफिक अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष, विवेक शिंदे, सागर चव्हाण, नानासाहेब जमदाडे तालुका कार्याध्यक्ष, महेश नलावडे, दर्शना बचुटे सा. न्याय, ज्योती माळे ता. अध्यक्ष, सलमा सौदागर अल्पसंख्याक ता. अध्यक्ष कळंब, बालाश्री पवार, मोहन जाधव जिल्हा उपाध्यक्ष युवक उस्मानाबाद, खलील पठाण अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष, विशाल शिंगाडे सां. वि. जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब स्वामी ओबीसी जिल्हा अध्यक्ष, राजेंद्र गायकवाड सा. वि., श्रीधर भवर तालुका अध्यक्ष कळम, विजय लोमटे विधानसभा अध्यक्ष लोहारा, सुनील साळुंखे लोहारा तालुका अध्यक्ष, बबन गावडे तालुका संघटक, अनमोल शिंदे, दिनेश क्षिरसागर, विकी घुगे, रोहित चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.