शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा लोहारा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:31 IST

गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातही घेतली धावगावात अवैध दारू विक्रीची तीन दुकाने

लोहारा ( उस्मानाबाद) : तालुक्यातील नागूर येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करावी, या मागणीसाठी महिलांनी शुक्रवारी लोहारा येथील तहसील व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले़ अधिकाऱ्यांना धारेवर धरत गावातील अवैध दारूविक्री कायम बंद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोहारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर साडेचार हजार लोकसंख्येचे नागूर हे गाव आहे़ या गावात गत अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री होत आहे़ अवैध दारू विक्रीची तीन दुकाने असून, अनधिकृत थाटलेल्या दुकानातून देशी, विदेशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. गावात दारू सहज उपलब्ध होत असल्याने युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत असून, तळीरामांमुळे महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शिवाय भांडण- तंट्यामुळे गावाची शांतताही बिघडत आहे़ त्यामुळे गावातील अवैध दारु विक्री बंद करावी, अशी मागणी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाकडे ग्रामस्थ, महिलांनी केली होती़ त्यानंतर पोलिसानी काही कारवाया करून दहा, वीस दारुच्या बाटल्या जप्त केल्या़ मात्र, कारवाईनंतरही पुन्हा दारू विक्री जोमाने सुरू राहते़ केव्हातरी होणारी कारवाई आणि खुलेआम सुरू असलेली दारूविक्री यामुळे संतप्त झालेल्या महिला, नागरिकांनी शुक्रवारी लोहारा येथील तहसील व पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले. 

अवैध दारूविक्रेत्यांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे सातत्याने कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला़ यावेळी इंदुबाई जावळे, राधा मोरे, अंजली पाटील, पद्मिनी पाटील, मनिषा जावळे, सुनंदा मोरे, गजराबाई कांबळे, रुपा सोनवणे, सुनंदा पवार, त्रिशला पाटील, रेखा मोरे, मैनाबाई जाधव, पार्वती शेवाळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़

तर तीव्र आंदोलन करूगावात दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतने घेतला असून, पोलीस अधिक्षक, उत्पादन शुल्क विभागाला निवेदनाद्वारे माहिती देऊन दारूबंदीची मागणी केली होती़ मात्र, दारूविक्री सुरू असल्याने आजचे आंदोलन करावे लागले़ यापुढे गावात दारूविक्री सुरू राहिली तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा सरपंच गणेश जावळे यांनी दिला़

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादTahasildarतहसीलदार