वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:28 AM2021-03-07T04:28:53+5:302021-03-07T04:28:53+5:30

परांडा : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडले, तरच पर्यावरणाचा ...

Wildlife protection and conservation is everyone's duty | वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

googlenewsNext

परांडा : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडले, तरच पर्यावरणाचा समतोल टिकून राहील, असे प्रतिपादन उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्रा.डॉ.स्वाती जाधव यांनी केले.

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि जागतिक वन्यजीव दिन हा एक दिवशीय विभागीय कार्यक्रम विज्ञान फोरम आणि प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.दीपा सावळे तर व्यासपीठावर भूमच्या शंकरराव पाटील महाविद्यालयाचे डॉ.नितीन पडवळ, प्रा.विद्याधर नलवडे, प्रा.डॉ.अतुल हुंबे, डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रा.अमर गोरे-पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ.शहाजी चंदनशिव यांनी केले. प्रा.विद्याधर नलवडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.नितीन पडवळ यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखून आपली ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी प्रा.दीपक तोडकरी, प्रा.जगन्नाथ माळी, प्रा.डॉ.कृष्णा परभणे, प्रा.डॉ.सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. आभार डॉ.सची चव्हाण यांनी मानले.

Web Title: Wildlife protection and conservation is everyone's duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.