उस्मानाबाद : घरात इतरांना कोरोना झाला होता. मला झाला नाही. आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी अँटिबाॅडीज तयार झाले आहेत, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा डोस घेतल्यानंतर अँटिबाॅडीज वाढल्या का, हे पाहण्यासाठी शहरातील विविध लॅबमध्ये नागरिक जात आहेत. (डमी)
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात अँटिबाॅडीज तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात अँटिबाॅडीज तयार होतात. हे एक प्रकारचे कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन तेवढेच महत्त्वाचे आहे. उस्मानाबाद शहरात मागील दोन महिन्यांत तीन व्यक्तींनी अँटिबाॅडीज तपासल्या आहेत. पहिला डोस किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढली का नाही याची तपासणी करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात प्रतिदिन २ ते ३ व्यक्ती लॅबमध्ये जात होते, तसेच जून महिन्यात पालक १५ वर्षांखालील बालकांची अँटिबाॅडीज तपासणीसाठी लॅबकडे येत होते. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाल्याने अँटिबाॅडीज तपासणीसाठीही नागरिक येत नसल्याचे लॅबकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील लसीकरण
पहिला डोस ३२४८२१
दोन्ही डोस ४०३९७५
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण ३८
रोज तीन तपासण्या
शहरातील काही खासगी लॅबमध्ये अँटिबाॅडीज तपासणी केली जाते. दुसऱ्या लाटेत अनेक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. कुटुंबातील एखादा व्यक्ती निगेटिव्ह येत. निगेटिव्ह आलेली व्यक्ती, तसेच पहिला व दुसरा डोस घेतलेली व्यक्ती पॅथोलॉजी लॅबमध्ये अँटिबाॅडीज तपासणीस जात आहेत. प्रतिदिन जवळपास ३ व्यक्ती अशा चाचण्या करीत आहेत. लसीकरणानंतर शरीरात अँटिबाॅडीज वाढत असल्या तरी शहरातील नागरिक अँटिबाॅडीज तपासणी करीत नसल्याचे सांगण्यात आले.
शहरात तपासणीचे प्रमाण कमी
लसीकरणानंतर तसेच काेरोनातून बरे झाल्यानंतर अँटिबाॅडीज तपासणीचे प्रमाण मेट्रोसिटीत अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तपासणीचे शुल्क परवडणारे नसल्याने ग्रामीण भागात अशी चाचणी करणे टाळत असतात. या चाचणीतून शरीरात अँटिबाॅडीजचे प्रमाण समजण्यास मदत होते.