आम्हाला पुस्तके कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:42+5:302021-06-23T04:21:42+5:30

परंडा : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी आता ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. परंतु, ज्यांच्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही, त्यांना पुस्तकांची ...

When will we get the books? | आम्हाला पुस्तके कधी मिळणार?

आम्हाला पुस्तके कधी मिळणार?

googlenewsNext

परंडा : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी आता ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. परंतु, ज्यांच्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही, त्यांना पुस्तकांची गरज असून, तालुक्यात शिक्षण विभागाने मागणी करूनदेखील अद्याप पुस्तके प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे ‘आम्हाला पुस्तके कधी मिळणार?’ असा सवाल या विद्यार्थ्यांमधून केला जात आहे.

परंडा तालुक्यात १३९ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात तब्बल १६ हजार ७७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पुस्तके दिली जातात. त्यानुसार तालुका शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकूण १३ हजार ९८३ पुस्तक संचाची मागणी शिक्षण मंडळाकडे केली आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असतानाही, अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तक संच प्राप्त झालेले नाहीत. बालभारतीकडून येणाऱ्या पुस्तक संचाची वाट पाहत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

चौकट...

पुस्तक परतीची योजना बारगळली..

समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ही पुस्तके जमा करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासंबंधी परंडा शिक्षण विभागाकडे माहिती विचारली असता, पुनर्वापर करणारी पुस्तके आम्हाला अजूनही मिळाली नाहीत, असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले.

पुस्तकांची मागणी

----------------------

इयत्ता विद्यार्थी संख्या पुस्तक संच

पहिली २२०१ १६८२

दुसरी २१६४ १६९७

तिसरी २२०३ १६९७

चौथी २०५० १७२४

पाचवी २१५५ १७४८

सहावी १९५० १६९९

सातवी १९४१ १७२०

आठवी २००९ १७२५

_____________________________________

उर्दू शाळेत १९० विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांकरिता उर्दू माध्यमिक पुस्तकाची मागणीदेखील करण्यात आली आहे.

Web Title: When will we get the books?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.