शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

‘लढू अन् पुन्हा जिंकू’; उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:58 IST

कार्यकर्त्यांनामध्ये बळ भरण्यासाठी लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा

ठळक मुद्देविकास करण्यास ‘त्यांना’ कोणी आडविले?काही मंडळी सत्तेविना राहू शकत नाही 

उस्मानाबाद : शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार तथा पवारप्रेमी आता सक्रीय झाले आहेत. शनिवारी परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून ‘‘लढू अन् पुन्हा जिंकू’’ असा निर्धार व्यक्त केला. नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी कार्यकर्त्यांची भक्कम फळी राष्ट्रवादीत कायम असल्याचा दावाही त्यांनी केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनामध्ये बळ भरण्यासाठी लवकरच शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे डॉ़पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपाचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. दरम्यान, पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे निष्ठावंत शिलेदार सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यामध्ये जीवनराव गोरे यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, संपत डोके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण यादव यांचा समावेश होता. सुरूवातीला गोरे यांनी भूमिका मांडली. काही नेते भाजपात गेल्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे संपली अशी, सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. परंतु, हे सत्य नाही. उस्मानाबादची जनता शरद पवार यांचे योगदान कधीच विसरणार नाही. जिल्ह्यात रेल्वे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एवढेच नाही तर १९९३ भूकंपानंतरचे त्यांचे कार्य अतुलनिय आहे. त्यामुळे यापूर्वी, सध्या आणि पुढेही शरद पवार हेच आमचे दैवत असतील. उस्मानाबाद, कळंब वगळता पक्षात फारशी पडझड झालेली नाही. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी कार्यकर्ते जागेवर असल्याचे ते म्हणाले. लवकरच पक्षाची नवीन कर्यकारिणी जाहीर करण्यात येईल. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  विकास करण्यास ‘त्यांना’ कोणी आडविले?‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपात जात आहे’’, असे आमदार पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. केंद्र तसेच राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असताना आ. पाटील यांना शरद पवार यांनी काय कमी केले? मंत्रीमंडळातील महत्वाची खाती, पदे त्यांच्याकडेच तर होती. तेव्हा त्यांना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास कोणी आडविले होते? असा सवाल आमदार विक्रम काळे यांनी केला. आजवर तरूणांना संधी मिळाली नाही. एकतर्फी सत्ता होती. त्यामुळे असंख्य तरूण वर्तुळाबाहेर होते. हे सर्वजण आता पक्षात सक्रीय होत असल्याचा दावा त्यांनी केला.

काही मंडळी सत्तेविना राहू शकत नाही शरद पवार आपल्या हृदयात असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले होते. असे जर असले तर त्यांचे हृदय नेमके किती मोठे आहे? हे तपासावे लागेल. अशी वाक्य केवळ बोलण्यापुरती असतात. हे खरे असते तर त्यांनी अडचणीच्या काळात शरद पवार यांची साथ सोडली, असा अरोप आमदार चव्हाण यांनी केला. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी तळागळातील कार्यकर्ते, पदाधिकारी पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार का? असा सवाल केला असता, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसOsmanabadउस्मानाबादSharad Pawarशरद पवार