उस्मानाबाद : नगर परिषद व महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या वतीने येथे लातूर विभागीय शिक्षक मेळावा पार पडला. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोळी होते. यावेळी उस्मानाबादचे उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी, उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार, राज्य चिटणीस अरुण पवार, राज्य महिला आघाडी प्रमुख रवींद्र मिरगणे, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कडलग, राज्य सदस्य माया कांबळे, नंदा तांदळे, सविता बोरसे, रेजा पायाळ, विभागीय अध्यक्ष अशोक शेडगे, जिल्हाध्यक्ष श्याम कोळी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अशोक शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन रेजा पायाळ यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष श्याम कोळी यांनी मानले.
मेळाव्यासाठी सुरेश गायकवाड, दिगंबर काळे, मनोज भोईटे, संतोष खंगले, अरविंद जाधव, महेंद्र पाटील, महेंद्र कावरे, मुकुंद नांगरे, आयाज मशायक, शंकर घंटे, संभाजी पडवळ, विश्वंभर माने, मधुकर खिल्लारे, बालाजी कानडे, दशरथ नधाडे, अण्णासाहेब जावळे, सुरेश मदने, नईम सय्यद, अतुल कनोजवार, प्रसाद पाटील, अमोल मोरे, श्रीकांत वाघमारे, सागर पाटील, गणेश रोचकरी, सूरजमल शेटे, लातूर विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.