जिल्हा परिषदेतील ‘समाजा’च्या ‘कल्याणा’ची धुरा असलेले पदाधिकारी आपल्या खुर्चीत बसले हाेते. त्यांच्यासमाेर काही सदस्यही बसलेले हाेते. याचवेळी भाजपाला ऐनवेळी साथ दिलेल्या सेनेच्या ‘त्या’ गटातील एक सदस्य आत आले. त्यावर खुर्चीत बसलेल्या एका सदस्याने ‘‘या नेते, बसा. काेणत्या गाडीने आलात’’, अशी विचारणा करताच, ‘‘आहाे, आमच्या नशिबी कुठली गाडी. टर्म संपत आली तरी एखादे दहा-पाच लाखाचे काम मिळाले नाही. तर गाडी कशी घेणार. एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीटाला आम्ही महाग आहाेत. तुमचे मात्र बरे आहे. दाेन्ही अध्यक्षांच्या काळात कामे जाेरदार सुरू आहेत. म्हणून तुम्ही हिवाळा असला तरी गाडीची ‘एसी’ बंद करीत नाहीत. सर्वच भात एकट्याच्याच पत्रावळीवर घेऊ नका. भाजीचा ओघळ तरी आमच्या ताटापर्यंत येऊ द्या’’, असे म्हणत ॲन्टी चेंबरमध्ये गेले.
आम्ही तर तिकिटालाही ‘महाग’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST