शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले

By चेतनकुमार धनुरे | Updated: February 28, 2023 18:08 IST

शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला; मात्र काहीही उत्तर न देता हसत हसत कडूंनी काढता पाय घेतला

धाराशिव : न्यायालयीन काम आटोपून बाहेर पडताना माजी मंत्री बच्चू कडू यांना मंगळवारी धाराशिवमध्ये एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. एका ८० वर्षीय शेतकऱ्याने कडूंना अडवून तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या, गद्दारांसोबत का गेलात, असा सवाल करीत काही वेळ वाहनही अडवून ठेवले होते. पदाधिकार्यांनी त्यांना बाजूला केल्यानंतरच कडूंची सुटका झाली व ते बाहेर रवाना झाले.

धाराशिवच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाजासाठी माजी मंत्री बच्चू कडू हे सोमवारीच दाखल झाले आहेत. कालच त्यांना न्यायालयाने एका आंदोलनावेळी पोलिसांचा अवमान केल्याप्रकरणी दंडाची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारीही कडू हे याच कामानिमित्त धाराशिवमध्ये होते. जिल्हा न्यायालयातील काम आटोपून ते बाहेर पडत असताना उपळे दुमाला येथील अर्जून भगवान घोगरे या शेतकर्याने अचानक त्यांना रोखले.

या आजोबांचे म्हणणे समजून घेण्यासाठी कडू थांबले असता त्यांनी प्रश्नांचा भडिमारच सुरु केला. शांतपणे कडू यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हसतच त्यांनी घोगरे यांच्यापासून सुटका करुन घेत आपल्या वाहनात बसले. यानंतरही घोगरे यांनी वाहनापुढे थांबून काही क्षण ते रोखून धरले होते. पदाधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला सारल्यानंतर कडू हे न्यायालयाबाहेर पडू शकले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादBacchu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरी