उस्मानाबाद - येथील शिवमूर्ती एकनाथ चुंगे यांनी आपल्या ताब्यातील टाटा मॅजिक हे वाहन (क्र. एमएच.२५-ई.२५६४) राष्ट्रीय महामार्गावर (क्र.६५) धाेकादायकरित्या उभे केल्याचे पाेलिसांना आढळून आले. याप्रकरणी पाेलिसांनी चुंगे यांच्याविरूद्ध उमरगा पाेलीस ठाण्यात २० जानेवारी राेजी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
३३२ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद - माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाभरातील १८ पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून दंडापाेटी सुमारे ७५ हजार ७०० रुपये तडजाेड शुुल्क म्हणून वसूल करण्यात आले. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले.
अवैध बांधकाम, दाेघांवर गुन्हा
उस्मानाबाद - शहरातील आदर्शनगर येथे शिवदास भाेसले यांनी तर जिजाऊनगर येथे कमल शेगर यांनी अवैध बांधकाम केले हाेते. पालिकेकडून त्यांना नाेटीस देऊन बांधकाम पाडण्याबाबत कळविले हाेते. परंतु, उपराेक्त दाेघांनीही बांधकाम पाडले नाही. त्यामुळे पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी सुनील कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपराेक्त दाेघांविरूद्ध आनंदनगर ठाण्यात २० जानेवारी राेजी गुन्हा नाेंद झाला.
घरासमाेर उभी केलेली दुचाकी लंपास
उस्मानाबाद - तुळजापूर शहरातील साैरभ राजेंद्र कदम यांनी आपली दुचाकी घरासमाेर उभी केली असता, अज्ञाताने १० जानेवारी राेजी लंपास केली. सर्वत्र शाेध घेऊनही दुचाकी मिळाली नाही. त्यामुळे कदम यांनी तुळजापूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून २० जानेवारी राेजी तुळजापूर ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.