शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 18:45 IST

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते.

ठळक मुद्देपाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दभारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक यावर्षी दोन मोठ्या परीक्षेत मिळवले यश

उमरगा (जि़उस्मानाबाद) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत एकूरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी देशात ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत देशात ६६ वा क्रमांक पटकाविला होता. वडील एसटीत मेकॅनिक असले तरी त्यांनी दिलेल्या पाठबळावर जिद्दीने असितने हे शिखर सर करुन दाखविले आहे़

असित यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण एकूरगा गावीच झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केले़ त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आई ललिता कांबळे अंगणवाडी सेविका आहेत़ प्रतिकूल परिस्थिती असतानाही मुलगा हुशार असल्याने त्यांनी असितच्या पंखात बळ भरले़ त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. आजही ते एकूरगा या गावात पत्र्याच्या घरात राहतात. आई-वडिलांनी पाहिलेले नागरी सेवेचे स्वप्न मुलाने अखेर पूर्ण केले. 

पाच वेळा आले अपयश, सोडली नाही जिद्दगेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. असित हे २०१३ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. तब्बल पाच वेळा त्यांना अपयश आले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. सहाव्या प्रयत्नात त्यांना हे यश लाभले आहे. त्यात वनसेवा व नागरी सेवेच्या लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वेळा मुलाखतीत यश मिळाले नव्हते़ जिद्द न सोडता त्यांनी प्रयत्न केले अन् यावर्षी या दोन्ही परिक्षांत त्यांनी दैदिप्यमान यश मिळविले़ या यशानंतर त्यांच्यावर एकुरगा या गावी नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला़

न्यूनगंड बाळगू नका याच वर्षी भारतीय वनसेवा स्पर्धा परीक्षेत निवड झाली होती़ आता नागरी सेवेतही निवड झाली आहे़ त्यामुळे मोठा आनंद झाला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकलोय म्हणून यश मिळणार नाही, असा न्यूनगंड बाळगू नये. परीक्षा कठीण असल्या तरी अभ्यासात कठोर परिश्रम, एकाग्रता व चिकाटी महत्त्वाची आहे़ यश नक्की मिळते. या प्रवासात आई-वडीलांचे, बहिणीचे आणि आजी-आजोबांचे तर आशिर्वाद असतातच. पण त्यांच्याइतकेच माझ्या सर्व शिक्षकांचे माझ्या आयुष्यात योगदान आहे.- असित कांबळे, आयएएस, ६५१ वी रँक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगOsmanabadउस्मानाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र