शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर अभूतपूर्व संकट, हे नुकसान लवकर भरून न येणारे : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:58 IST

Sharad Pawar Visit Usmanabad राज्यावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या स्थितीत केंद्राच्या मदतीची गरज आहे

ठळक मुद्देकानउघाडणी नंतरही पदावर राहायचे का हे राज्यपालांनी ठरवावे नव्या विधेयकाने भविष्यात शेतमाल खरेदीत एकाधिकारशाही येईल

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : अतिवृष्टीने राज्यावर अभूतपूर्व संकट आले आहे. यामध्ये झालेले नुकसान हे केवळ एक हंगामाचे, वर्षाचे नाही तर त्याच्या दुरुस्तीला अनेक वर्षे जातील. सध्या राज्य ऐतिहासिक आर्थिक संकटात आहे. तरीही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नवे कर्ज काढता येईल, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी तुळजापूर येथे सोमवारी केले.

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, राज्यावर आलेल्या या अभूतपूर्व संकटाच्या स्थितीत केंद्राच्या मदतीची गरज आहे, एकट्या राज्याला हे पेलणारे नाही. यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. तेव्हा पिकविम्याच्या निकषात, धोरणात अशा आपत्कालीन स्थितीसाठी शिथिलता हवी, हे केंद्राच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पवार म्हणाले.भविष्यात शेतमाल खरेदीत एकाधिकारशाही सुरू होईल.

दरम्यान, केंद्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या कृषी विधेयकावरही टिप्पणी करीत त्यातील धोका सांगितला. शेतमाल खरेदीत मोठ्या जागतिक कंपन्या उतरतील, आता चांगला भाव देतीलही. पण एकदा येथील व्यापारी संपले की मग ते म्हणतील त्या दराने माल द्यावा लागेल. एकाधिकारशाही सुरू होईल.

खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेतएकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत, विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या, याची नोंद पक्ष घेत नाही, असे त्यांना वाटत असेल. दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटत असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर त्यांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.

मुख्यमंत्री एका ठिकाणी बसून नियोजन करतात राज्यपालानी स्वतःच्या पदाची व मुख्यमंत्री पदाची किंमत ठेवावी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केलीय. यानंतरही पदावर राहावे वाटत असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पवारांनी केली. मुख्यमंत्रीही पाहणी दौऱ्यावर येत आहेत. ते बाहेर पडत नाहीत असे नाही, आम्हीच त्यांना सांगितलंय एका ठिकाणी बसून नियोजन करायला, असे सांगत ठाकरे यांची पाठराखण केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी