शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ उल्लेख; मंदिर संस्थानच्या पत्रावरून गदारोळ, पुजारी मंडळ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:17 IST

तुळजाभवानीचा ‘भारतमाता’ म्हणून उल्लेखावर तिन्ही मंडळांनी घेतला आक्षेप

तुळजापूर (जि. धाराशिव) : शहर व मंदिर विकास अंतर्गत शहरातील रामदारा तलाव परिसरात श्री तुळजाभवानी देवीचे १०८ फुटी भवानी तलवार शिल्प कलारूपी पुतळा उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात भोपे पुजारी, पाळीकर पुजारी व उपाध्ये पुजारी या मंडळांना पत्र पाठवून सूचना, मते मागविली हाेती. या पत्रामध्ये श्री तुळजाभवानी भारताची भारतमाता झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या शब्दावर आता तिन्ही पुजारी मंडळांनी आक्षेप घेत विराेध केला आहे.

श्री तुळजाभवानी देवीच्या १०८ फुटी भवानी तलवार शिल्पाबाबत विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली हाेती. यानंतर मंदिर संस्थानने पुजाऱ्यांच्या तिन्ही मंडळांना पत्र पाठवून सूचना मागविल्या हाेत्या. याच पत्रामध्ये श्री तुळजाभवानी देवी भारताची भारतमाता झाली आहे, असा उल्लेख हाेता. ही बाब समाेर आल्यानंतर तिन्ही मंडळांनी तीव्र शब्दात आक्षेप नाेंदविला. वास्तविक पाहता देवतांची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. श्री तुळजाभवानी ही देवता तर जगत जननी म्हणून ओळखली जाते. असे असताना मंदिर प्रशासनाने भारतमाता असा उल्लेख का केला? असा प्रश्न पुजारी मंडळांनी केला आहे. मंदिर प्रशासन कोणताही धार्मिक निर्णय घेताना पुजारी व सर्व महंतांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत आहे. त्यामुळे अनेक निर्णय वादग्रस्त ठरताहेत. याबाबतीत वेळीच सुधारणा व्हायला, हवी असेही पुजाऱ्यांचे म्हणणे आहे.

कडाडून विराेध केला जाईलभोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला मंदिर संस्थानने पत्र दिले आहे. परंतु, या पत्रात तुळजाभवानी माता ही आता भारतमाता आहे, असा उल्लेख केलाय. याला विराेध आहे. भवानी तलवार हे शिल्प अष्टभुजा स्वरूपात न राहता सद्य:स्थितीत ज्या पद्धतीत मंदिरात पूजा मांडली जाते त्याच स्थितीत असावे. इतर कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास कडाडून विराेध केला जाईल.-अमरराजे परमेश्वर, अध्यक्ष, भाेपे पुजारी मंडळ.

जागा अतिशय चुकीची पुजाऱ्यांनी पत्रावर आक्षेप घेतल्यानंतर भवानीमाता हा शब्द वगळून नवीन शुद्धिपत्रक काढले आहे. परंतु, मुळातच ज्या ठिकाणी हे शिल्प उभारले जाणार आहे, त्या ठिकाणाला आमचा विराेध आहे. कारण ती जागा अतिशय चुकीची व गावच्या एका कोपऱ्यात आहे. याबाबतीतही विचार व्हायला हवा.-बिपीन शिंदे, अध्यक्ष, पाळीकर पुजारी मंडळ.

टॅग्स :dharashivधाराशिव