शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड अन्‌ बांधावर लिंब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:33 AM

कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, ...

कळंब : मागच्या पिढीने जिथं माणसांचा राबता, तिथं वृक्षसंपदा जोपासली. त्यामुळे अंगणी तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, बांधावर लिंब, अशी परिस्थिती गावागावात दिसून येत होती. जास्त ‘ऑक्सिजन’ देणाऱ्या या वृक्षांचे महत्त्व त्यांनी जाणले होते, हेच यावरून अधोरेखित होते. यामुळे ‘श्वास’ गुदमरत असलेल्या सध्याच्या पिढीने याचे अनुकरण करावे, असाच संदेश यातून मिळत आहे.

मनुष्यप्राणी, पशू, पक्षी अशा जैवविविधतेला ‘प्राणवायू’ देण्याचे काम याच सजीवसृष्टीतील वनस्पती करीत आल्या आहेत. वृक्षसंपदा घनदाट, तर पर्यावरण संतुलित अन् पर्यावरण समृद्ध, तर मानवी स्वास्थ्य धडधाकट, असे हे चक्र अनादि काळापासून चालत आलेले आहे.

संतांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे...’चा दाखला यातूनच दिला असावा. हे मागच्या पिढ्यांनी जाणलं होतं. म्हणूनच त्यांनी वृक्षसंपदा जपत आपला ‘अधिवास’ पर्यावरणपूरक केल्याचे दिसून येते.

मागच्या काही दशकांत गावगाड्यात ‘विकास’ घुसला. यामुळे गावे बदलली. असे असले तरी काही गावांत मागच्या पिढ्यांच्या खाणाखुणा अद्याप शिल्लक आहेत. गावात दाखल झाल्यानंतर दिसणारी घनदाट व डौलदार झाडे, ही यापैकीच एक. वेशीवर, नाक्यावर, मोक्यावर, चौकात अन् पारावर या टुमदार वृक्षांचे बीजारोपण मागच्या पिढ्यांनी केले. त्यातून उरल्यासुरल्या खुणांची सावली आजची ‘स्मार्ट’ पिढी घेत आहे.

विशेषतः वर्दळ व मोक्याच्या ठिकाणी लावलेली ही झाडे अधिक ऑक्सिजन देणारी आहेत. जीवनात प्राणवायूला असलेलं महत्त्व त्या पिढीला माहीत होतं हेच यावरून स्पष्ट होतं. सध्याच्या कोरोना संकटात ‘ऑक्सिजन’चा अभाव अन् यामुळे श्वास गुदमरलेले रुग्ण पाहिल्यावर ‘झाडं लावा, झाडं जगवा’ नव्हे, तर ‘झाडं लावा, माणसं जगवा’ असाच संदेश पुढच्या पिढीला ही वृक्षसंपदा देत आहे.

चौकट...

वृक्ष नव्हे, हे तर ‘ऑक्सिजन प्लांट’

अंगणात तुळस, पारावर पिंपळ, वेशीवर वड, विहिरीवर उंबर, बांधावर कडुलिंब, ओढ्यात जांभूळ हा मागच्या पिढीचा शिरस्ता होता. इतरांपेक्षा अधिक ऑक्सिजन देणारी ही झाडं. त्यातच गावाची लोकसंख्या जेमतेम. यामुळे गाव, पार अन् वे‌शीवर एकत्र यायचं, शेतात राबायचं अन् घरात स्थिरावायचं. नेमक्या अशाच ठिकाणी जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची मागच्या पिढ्यांनी लागवड केली. इटकूर, कन्हेरवाडी, मस्सा, शेवगाव, गंभीरवाडी, आडसूळवाडी, बहुला, मोहा अशा अनेक गावांत पार, वेस, चौकात असे जुन्या पिढीने कार्यान्वित केलेले ‘ऑक्सिजन प्लांट’च्या खुणा आजही आहेत.

या देशी वृक्षांचे महत्त्व जाणा

वटवृक्ष कुळातील वड, पिंपळ, उंबर, नांदुरकी यासह तुळस, कडुनिंब, अशोक, बांबू, जांभूळ, अर्जुन, कदंब आदी वृक्ष आदी जास्त काळ व जास्त क्षमतेने ऑक्सिजन देतात. यात २३ तासांपैकी साधारणतः २२ तास पिंपळ, तर इतर २० तासांच्या आसपास ऑक्सिजन देतात. जितकी पानं जास्त तितका प्राणवायू जास्त. यामुळेच आकाराने मोठे, पानाची संख्या जास्त असलेल्या पिंपळ, अक्षयवृक्ष अर्थात वडाचे स्थान यासंदर्भात मोठे मानाचे आहे. ही सारी देशी वृक्षसंपदा जुनी पिढी प्राधान्याने जोपासत आली होती.

वृक्ष, मनुष्य आणि ऑक्सिजन

रंग, गंध व चवहीन असलेलं ‘ऑक्सिजन’ मनुष्यासाठी ‘प्राणवायू’ आहे. शरीरात ९५ ते १०० असा प्राणवायूचा स्तर असेल तर शरीर कार्यक्षम राहते, सर्व अवयव चांगले काम करतात. अन्न-पाण्यातून १०, तर ऑक्सिजनमधून ९० टक्के ऊर्जा मिळते. श्वासातूून घेतल्या जाणाऱ्या हवेत २० टक्के ऑक्सिजन असतो. एक मनुष्य साधारणतः मिनिटाला पंधरा, तर दिवसाला २१ हजार ६०० श्वास घेतो. एकूणच माणसाला दिवसाला ५५० लिटर ऑक्सिजन लागतो. आता झाडाचा विचार केला, तर एक झाड प्रतिदिन किमान २३० ते ४०० लिटर ऑक्सिजन देते. एक पान एका तासात पाच मिलिलिटरपेक्षा जास्त ऑक्सिजन देते. वायुमंडलात ७८ टक्के नायट्रोजन व २१ टक्के ऑक्सिजन असतो. यातील ७० ते ८० टक्के ऑक्सिजन समुद्री वनस्पती देतात. जमिनीवरील वनस्पतीचा यात वाटा तुलनेने कमी आहे. यामुळे दररोज घटत चाललेली वृक्षसंपदा हे किती धोकादायक आहे, हे यावरून लक्षात येते.