शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चालबाजी ! पैसे देण्याच्या बहाण्याने स्वॉईप मशीनमधून केले रिव्हर्स ट्रान्झॅक्शन; सहा जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:08 IST

crime news usmanabad तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ६ तरुण एका कारने दाखल झाले.

ठळक मुद्देस्वाईप मशीनने पैसे भरण्याचा बहाणा करत पंपावरील मशीन कर्मचाऱ्याकडून ताब्यात घेतलीकर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून ठेवत एका तरुणाने पैसे भरण्याऐवजी उलट रिव्हर्स ट्रान्झॅक्शन केले

उस्मानाबाद : इंधन भरल्यानंतर स्वाईप मशीनने पैसे देण्याच्या बहाण्याने उलट त्यातूनच १० हजार रुपये लांबविणाऱ्या तरुणांना मंगळवारी पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर नळदुर्ग ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील एका पेट्रोल पंपावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ६ तरुण एका कारने दाखल झाले. येथे त्यांनी वाहनात इंधन भरून घेतल्यानंतर स्वाईप मशीनने पैसे भरण्याचा बहाणा करत पंपावरील कर्मचारी प्रवीण गायकवाड यांच्याकडून ही मशीन ताब्यात घेतली नंतर काही तरुणांनी प्रवीण यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याच काळात एका तरुणाने पैसे भरण्याऐवजी उलट त्यातूनच रिव्हर्स ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून खात्यातील १० हजार रुपये लांबविले व तेथून सर्वांनीच पोबारा केला. 

हा फसवणुकीचा प्रकार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत कारचे वर्णन बिनतारी संदेश यंत्रणेने जिल्हाभर प्रसारित केले. दरम्यान, दुपारी संबंधित वर्णनाची कार ही तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेऊन कार ताब्यात घेत विजय धोंडिराम सूर्यवंशी, नितीन आनंद भिडे, आशपाक दस्तगीर शेख, सोहम लक्ष्मीकांत पाटील, ज्ञानेश्वर गंजेराम नरोडे, सचिन भाऊलाल पाटील यांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी नाशिक येथील असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद