शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
4
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
5
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
6
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
7
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
8
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
9
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
10
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
11
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
12
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
13
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
14
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
15
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
16
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
17
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
18
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
19
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
20
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण

साडेआठ महिन्यांनंतर पुन्हा दर्शन! धाराशिवच्या डोंगररांगात वाघाची डरकाळी, शेतकरी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:15 IST

कॅमेरा, रेस्क्यू टीमलाही गुंगारा देणाऱ्या वाघाने पुन्हा एकदा दिली हजेरी! वरवंटी शिवारातील माळावर झाले दर्शन

धाराशिव : तब्बल साडेआठ महिन्यांपासून धाराशिव, सोलापूर अन् अहिल्यानगरच्या सीमेवर आपले बस्तान ठोकलेल्या वाघाने ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दर्शन दिले. धाराशिव शहरालगतच्या डोंगररांगातील वरवंटी शिवारात सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास एका माळावर खुलेआम फिरताना फोडलेल्या डरकाळ्यांनी या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून मजल-दरमजल करीत धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात दाखल झालेला वाघ पहिल्यांदा २० डिसेंबर २०२४ रोजी दिसला होता. दोन महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या बिबट्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघोबाची छबी कैद झाली होती. यानंतर मागच्या साडेआठ महिन्यांपासून धाराशिव, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील वनक्षेत्रात त्याने आपले बस्तान ठोकले आहे. मागील तीन महिन्यांपासून तो सोलापूरच्या वनक्षेत्रात रमला होता. दरम्यान, आता त्याने धाराशिवकडे कूच केली आहे. शहरालगतच्या डोंगर रांगामध्ये वसलेल्या वरवंटी शिवारात गुरुवारी सकाळी महादेव टेकडीवर बिनधास्त वावरताना दिसून आला. त्याला पाहण्यासाठी शेतकरी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या टेकडीवरून वाघाने लगतच्या वनक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. लगतच मोठ्या पमाणात शेतीक्षेत्र असल्याने शेतकऱ्यांमध्ये भय पसरले आहे.

वनविभागाची पेट्रोलिंग सुरूवरवंटी शिवारात वाघ दिसल्याची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महादेव टेकडीकडे धाव घेतली. यानंतर त्याच्यावर पहारा ठेवण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात १० वनरक्षक व वनपालांचा समावेश आहे. या पथकांद्वारे वाघाचा माग काढणे सुरू असून, परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत.

रेस्क्यू टीमच्याही हातावर तुरी२० डिसेंबर २०२४ रोजी पहिल्यांदा वाघ आढळून आल्यानंतर रामलिंग अभयारण्यात पहिल्यांदा पुण्याची व नंतर ताडोबा अभयारण्यातील रेस्क्यू टीमने वाघाला ताब्यात घेण्यासाठी जवळपास महिनाभर जीवाचे रान केले. मात्र, प्रत्येक वेळी टप्प्यात आल्यानंतरही वाघाने टीमच्या हातावर तुरी दिल्या. सोलापूरच्या वनक्षेत्रात गेल्यानंतर ही मोहीम थंडावली.

टॅग्स :Tigerवाघdharashivधाराशिवforest departmentवनविभाग