तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बऱ्याच कालावधीनंतर आरोग्य विभागाने मंगळवारी पुन्हा लसीकरण शिबीर भरविले. राणाजगजितसिंह पाटील प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात तीनशेजणांना ही लस टोचण्यात आली.
येथे यापूर्वी दोन वेळा लसीकरण शिबीर घेण्यात आले होते. मात्र, लसीचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने अनेकजण वंचित राहिले होते. मंगळवारी लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळी आठ वाजल्यापासून गर्दी केली होती. पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शिदे व माजी सरपंच बापुसाहेब पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक यशवंत लोढे, हनमंत गवळी, सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य शहाजी लोंढे, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, ज्ञानेश्वर माळी रामलिंग सगर, पांडुरंग पटाडे, शाहीर गायकवाड, सतीश माळी, शिवाजी सावंत, सुधाकर लोंढे, आप्पा रणसुरे, डॉ. रविकांत गुरव, ज्ञानेश्वर पाटील, नागनाथ मसुते, भाऊ घोटकर, चौडाप्पा मसुते, संभाजी माळी आदी गावकरी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक लाभार्थ्याला प्रतिष्ठाणच्या वतीने आ. राणाजगजितसिंह पाटील याच्या हस्ते भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, यावेळी प्रतिष्ठाणच्या वतीने आ. पाटील यांचा माजी सरपंच दत्तात्रय वडणे यांनी सत्कार केला. यावेळी उपसभापती दत्तात्रय शिदे शहाजी लोंढे यांच्यासह प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते हजर होते. शिबिरासाठी आरोग्य विभागाच्या डॉ. शुभांगी जळकोटे, आरोग्य सेविका संगीता चव्हाण, पर्यवेक्षिका शोभा आदलिगे, सपोनि सचिन पंडीत, बिट अंमलदार गोरोबा गाढवे, प्रतिष्ठाणचे स्नेहल राऊत, रामलिंग सगर, राघवेंद्र चाबुकस्वार, संतोष घोटकर आदींचे सहकार्य लाभले.