शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाच्या ओवाळणीत बहिणींना मिळाला रस्ता; उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची कार्यतत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 13:20 IST

पारगाव-हातोला-पांगरी या तिन्ही गावांसाठीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली हाेती.

- राहुल डाेकेपारगाव (जि. उस्मानाबाद) : वेळाेवेळी पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वाशी तालुक्यातील हाताेला, जेबा, पांगरी, ब्राह्मगावच्या महिलांनी रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना राखी बांधून ओवाळणीत रस्त्याची मागणी करण्याचा निर्धार केला हाेता. त्यावर जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनीही तत्परतेने राखी मिळण्यापूर्वीच या भगिनींना ओवाळणीत रस्ता मंजुरीचे पत्र दिले. भाऊरायाने दिलेल्या या अनाेख्या भेटीने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

पारगाव-हातोला-पांगरी या तिन्ही गावांसाठीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली हाेती. प्रवास करणे कठीण झाले हाेते. सततच्या अपघातांमुळे काहींना जीव गमवावा लागला, तर काहींना जायबंदी व्हावे लागले. रस्त्याची डागडुजी व्हावी, यासाठी तिन्ही गावांकडून पाठपुरावा केला जात हाेता. 

‘लाेकमत’चा पाठपुरावा...

खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाेणारे बेहाल सर्वप्रथम ‘लाेकमत’ने मांडले हाेते. यानंतरही पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यावर ग्रामस्थांसह महिलांची बैठक हाेऊन रक्षाबंधन दिनी जिल्हाधिकारी यांना राख्या पाठवून ओवाळणीत रस्ता मंजुरीचे पत्र मागण्याचा निर्धार केला हाेता.

अनोख्या भेटीने महिलांना आनंद

प्रश्नाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी खड्डेमय रस्त्यामुळे हैराण झालेल्या चारही गावांतील भगिनींना राखी मिळण्यापूर्वीच ओवाळणीत ९०० मीटर रस्ता मंजुरीचे पत्र दिले. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी १ कोटी २० लाख रुपये प्रस्तावित केले. जिल्हाधिकारी भाऊरायाने दिलेल्या या भेटीने महिलांना आनंद झाला.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनOsmanabadउस्मानाबाद