शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 21, 2023 14:18 IST

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत.

धाराशिव : मराठा समाजाला ५० टक्केच्या आतील आरक्षण ओबीसीमधूनच देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर ते मंत्रालयादरम्यान ‘मराठा वनवास यात्रा’ काढली जाणार आहे. यात्रेस ६ मे रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होईल व ती ६ जून रोजी मंत्रालयावर धडकेल, अशी माहिती मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून दिली.

सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत संयोजक योगेश केदार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी ६ मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेस सुरुवात होईल. ही यात्रा विविध गावांत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करीत ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळादिनी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. यंदाचा राज्याभिषेक सोहळा मराठा बांधव आझाद मैदानावरच साजरा करतील, असे सांगितले. या यात्रेत हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, तसा अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत मराठा बांधव ठिय्या मांडून बसणार असल्याचे केदार म्हणाले. जास्तीत जास्त समाजबांधवांनी मराठा वनवास यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले.

पावणेपाचशे किलोमीटरचा प्रवास...तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. तुळजापूर ते मुंबई दरम्यान ९२ गावांमधून ही यात्रा जाणार आहे. काही गावांमध्ये मुक्काम व सभाही होणार आहेत. पहाटे पाच ते सकाळी १० व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवास केला जाणार आहे. असे मराठा वनवास यात्रा संयोजक सुनील नागणे म्हणाले.

पवारांनी खंजीर खुपसला...२३ मार्च १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ओबीसीचे आरक्षण वाढवून ५० टक्केचा कोटा पूर्ण केला. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण गेले. शरद पवार यांनी असा निर्णय घेऊन मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप संयोजकांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOsmanabadउस्मानाबादState Governmentराज्य सरकार