शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कांदे काढणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला ! तोरंबा शिवारातील घटना

By बाबुराव चव्हाण | Updated: January 28, 2024 23:17 IST

तपासासाठी श्वान पथक दाखल

लोहारा (जि. धाराशिव) : शेतात कांदा काढणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह ज्वारीच्या फडात आढळून आल्याची घटना तालुक्यातील  तोरंबा शिवारात रविवारी रात्री उघडकीस आली. ही माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील एक ३५ वर्षीय महीला रविवारी गावातीलच एकाच्या शेतात कांदे काढणीसाठी गेली होती. दुपारी जेवन करण्यासाठी त्या घरी न आल्याने त्यांचे पती जेवनाचा डबा घेवून शेतात गेले. परंतु, कांद्याच्या शेतात पत्नी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी अन्य तिघा-चौघांना सोबत घेऊन पत्नीचा शोध सुरु केला.

यावेळी जवळच असलेल्या ज्वारीच्या फडात या महिलेचा मृतदेह त्यांना आढळून आला. या घटनेची  माहिती मिळाल्यानंतर लोहारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस धवन, पापुलवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू होत्या.  शिवाय पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकास ही पाचारण केले होते. या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनीही रात्री घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत लोहरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.