शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वैज्ञानिक संशोधनासाठी टाटांचे दहा फुगे उडणार, ते मराठवाडा- विदर्भासह 'येथे' कोसळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:10 IST

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे.

उस्मानाबाद : वैज्ञानिक संशोधनासाठी हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेकडून पुढील पाच महिन्यात वैज्ञानिक उपकरणांसह १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडण्यात येणार आहेत. ते उस्मानाबादसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पडण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे. अशी उपकरणे जमिनीवर पडलेली आढळल्यास कोणीही स्पर्श न करता प्रशासनास माहिती कळविण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी केले आहे.

अणुऊर्जा विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्था १ नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ या पाच महिन्यांच्या काळात १० बलून फ्लाईटस् आकाशात सोडणार आहे. यामध्ये संशोधनाच्या दृष्टीने वैज्ञानिक उपकरणे ठेवलेली असतील. ५० ते ८५ मीटर व्यासाचे हे फुगे हायड्रोजन वायूने भरलेले असतील. ते जमिनीपासून ३० ते ४२ किमी उंचीवरून उडतील. काही तासांच्या उड्डाणानंतर हे फुगे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. हैदराबादपासून ते साधारणत: २५० ते ३०० किमी अंतरावर उतरतील, असा संस्थेचा अंदाज आहे.

या व्यासात कोणते जिल्हे...संस्थेचे हे फुगे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक राज्यातून वहन करणार आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव व सोलापूर जिल्ह्यात उतरण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे.

हाताळणी ठरेल धोकादायक...फुग्यांमध्ये संवेदनशील वैज्ञानिक उपकरणे असतील. त्यांच्याशी छेडछाड झाल्यास महत्त्वाची माहिती नष्ट होऊ शकेल. तसेच काही उपकरणे हाय व्होल्टेज असल्याने त्यांची हाताळणी धोकादायक ठरू शकेल. यामुळे उपरोक्त फुगे जमिनीवर कोणास आढळल्यास पोलिस, डाक विभाग किंवा स्थानिक प्रशासनास कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीसही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :scienceविज्ञानOsmanabadउस्मानाबादTataटाटा