शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सात अधिका-यांवर निलंबनाची कारवाई, निवडणूक कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:00 IST

कळंब तालुक्यातील गौर येथील एका प्रभागातील मतमोजणीत ‘नोटा’ला २३६ मते मिळाली होती. यावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाली होती.

कळंब (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील गौर येथील एका प्रभागातील मतमोजणीत ‘नोटा’ला २३६ मते मिळाली होती. यावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ते मतदान अधिकारी अशा सात कर्मचाºयांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.कळंब तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची मंगळवारी मतमोजणी झाली. यावेळी गौर व आवाड शिरपुरा येथील मतदान व मतमोजणीसंदर्भात आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. गौर येथील प्रभाग ३ मध्ये एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित होती.मंगळवारी मतमोजणीत ‘नोटा’ला २३६ मते पडल्याची नोंद झाली होती. यावर येथील उमेदवार शोभा अवधूत यांचे मतदान प्रतिनिधी सिद्धेश्वर अवधूत यांनी आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. बागल (विस्ताराधिकारी, गटशिक्षण), सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस.धावारे (केंद्रप्रमुख, गटशिक्षण), सहाय्यक तलाठी यु. सी. घुले,मतदान केंद्राध्यक्ष आर. बी. बिक्कड (प्रा.शा. पाथर्डी), मतदान अधिकारी बी. डी. कदम (कन्या प्रशाला, कळंब), आर. ए. उकिरडे (प्रा.शा. बोरगाव बु), एस. टी. समुद्रे (प्रा.शा. बोरगाव बु) या सात कर्मचाºयांचे निलंबन झाले़ 

टॅग्स :Electionनिवडणूक