शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या हाकेनंतर उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद

By बाबुराव चव्हाण | Updated: October 29, 2022 13:04 IST

आमदारांच्या आंदाेलनाला पाठिंबा, दुचाकी रॅली काढून केले बंदचे आवाहन

उस्मानाबाद: शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा कचेरीसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे शनिवारी उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली हाेती. शिवसेनेच्या या हाकेला व्यापार्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट हाेता.

पीकविमा खरीप हंगाम २०२० चे ३३० कोटी, २०२१ चे उर्वरित ३८८ कोटी, नुकसान भरपाईचे  २४८ कोटी रुपये अनुदान तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याकरीता शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी साेमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. अद्याप ठाेस ताेडगा न निघाल्याने त्यांचे हे आंदाेलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. पीक विम्यासाठीच्या त्यांच्या या लढ्याला समर्थन देण्यासाठी ग्रामीण भागातही आता आंदाेलने सुरू झाली आहेत. दरम्यान, शनिवारी शिवसेनेकडून उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली हाेती. त्यानुसार शिवसैनिकांनी सकाळीच संपूर्ण शहरातून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. शिवसेनेच्या या आवाहनास प्रतिसाद देत व्यापार्यांनीही आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शहराच्या सर्वच भागातील बाजारपेठेत शुकशुकाट हाेता.

रस्त्यावर टायर जाळले- एकीकडे शहर कडकडीत बंद असतानाच दुसरीकडे शिवसैनिकांनी शहरातील तेरणा काॅलेजसमाेरील रस्त्यावर टायरची जाळपाेळ केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली हाेती. शुक्रवारी लाेहार्यातही टायर जाळण्यात आले हाेते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादStrikeसंप