गेल्या महिन्यात सोयाबीनच्या दराने दहा हजारी पार केली होती. त्यामुळे काढणीचे भावही एकरी चार ते पाच हजार रुपये झाले. पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळे नांगरणीचे भावही या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु, दहा हजार भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनमधून थोडाबहुत नफा मिळण्याची आशा होती. पेरणीनंतर जवळपास २५ दिवसांचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीनची फुले गळून गेली होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे कसेबसे थोड्याबहुत शेंगा लागल्या. आता याला चांगला भाव मिळेल, अशी आशा असतानाच या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
कोट.......
या वर्षी नांगरणीचे भाव अठराशे रुपये व आता सोयाबीन काढणीला एका बॅगला चार ते पाच हजार रुपये मजूर मागत आहेत. परंतु, काल रात्री झालेल्या अचानक पावसामुळे पूर्ण शेतातील सोयाबीन पाण्याखाली गेल्यामुळे आता ते काढणे अवघड आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व विमा कंपनीलाही आदेश देऊन ताबडतोब शेतकऱ्यांना विमा मंजूर करून तो वाटप करावा यावा. त्यामुळे तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.
- राहुल पाटील, शेतकरी