शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जावई सरकारी नाेकरीवाला हवा, मग पेन्शनला विराेध का? संपकरी कर्मचाऱ्यांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: March 17, 2023 16:06 IST

टाळ-मृदंगाचा गजर करीत संपकऱ्यांनी वेधले मागणीकडे लक्ष

धाराशिव : जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. समाधानकारक निर्णय न झाल्याने शुक्रवारी चाैथ्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. साेशल मीडियावर आंदाेलन ट्राेल हाेवू लागल्याने कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली. 

प्रत्येकजण जावई शाेधताना ताे सरकारी नाेकरीवाला आहे का, हे पाहिले जाते. मग आमच्या आंदाेलनाला विराेध का, असा सवाल उपस्थित केला. यावेळी संपकर्यांनी टाळ-मृदंगाचा गजर करीत पेन्शनच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.

जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, यासाठी सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयांत रूग्णांचे हाल हाेताहेत. तर शास्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची नामुष्की मेडिकल काॅलेजवर ओढावली आहे. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया सध्या करण्यात येत आहेत. साेबातच महसूल तसेच जिल्हा परिषदेतील मार्चएन्डची कामेही खाेळंबली आहेत. तर दुसरीकडे संप लांबत चालला आहे. जाेपर्यंत सरकार मागणीचा विचार करणार नाही, ताेवर माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. दरम्यान, संपाच्या चाैथ्या दिवशी कर्मचार्यांनी टाळ-मृदंगाचा गजर करीत पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘पेन्शन द्या, पेन्शन द्या’, अशा स्वरूपाचा काही घाेषणाही देण्यात आल्या. यानंतर कर्मचार्यांनी सरकारने पेन्शनच्या मुद्याच्या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाचेही दहन करण्यात आले.

आता राजपत्रित अधिकारी महासंघाचाही पाठींबा...पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. आता त्यांना महाराष्ट्र राज्य रात्रपत्रित अधिकारी महासंघाचीही साथ लाभली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचार्यांचे मनाेधैर्य वाढवण्यासाठी सर्व अधिकार्यांनी जेवनाच्या वेळेत एकित्रित निदर्शने करावीत. या काळात ताेडगा निघाला नाही तर २८ मार्चपासून बेमुदत संप आंदाेलनात सक्रीय सहभागी व्हावे, असे महासंघाचे अध्यक्ष विनाेद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे व काेषाध्यक्ष नितीन काळे यांनी काढले आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद