शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी स्थळ पाहणी समिती १६ जुलैला उस्मानाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:15 IST

उस्मानाबादला बहुमान मिळण्याची शक्यता

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या उस्मानाबादकरांचा मार्ग यावेळी सुकर होताना दिसत आहे. संमेलनाच्या आयोजनासंदर्भात महामंडळाने निश्चित केलेले स्थळ पाहणी पथक १६ व १७ जुलै रोजी उस्मानाबादेत दाखल होत आहे़ याअनुषंगाने मसाप व उस्मानाबादकरांनी जोरदार तयारी चालविली आहे़ 

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. आगामी संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. पैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. त्यानुसार स्थळ पाहणीकरिता महामंडळाची समिती या दोन ठिकाणी भेट देणार आहे. १६ व १७ जुलै रोजी समिती उस्मानाबादेत आढावा घेईल, असे महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखा अध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे. हे पथक संमेलन आयोजनाबाबत स्थानिक संस्थेकडून निधी संकलनासाठी करण्यात आलेली तयारी, मनुष्यबळ, संमेलनासाठी योग्य जागा, निमंत्रितांची व प्रतिनिधींची निवास व्यवस्था आदींबाबत माहिती घेऊन पाहणी करणार आहे.

मसापची आज बैठक१७ जुलै रोजी स्थळ पाहणी समितीसोबत आयोजित बैठकीच्या पूर्वतयारीसाठी तसेच पथकासमोर सविस्तर मांडणी करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक होत आहे़ उस्मानाबादच्या हॉटेल रोमा पॅलेसच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी ५़३० वाजता ही बैठक आयोजित केली असल्याचे शाखाध्यक्ष नितीन तावडे यांनी कळविले़

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यOsmanabadउस्मानाबाद