शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शोषखड्डा खोदताना बाजूची टाकी फुटली; खड्ड्यात वेगाने घाण पाणी भरल्याने दोघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:45 IST

Two labors death in Usmanabad : पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता.

ठळक मुद्देवाचविण्यासाठी गेलेला एक जण वाचला...नवीन खड्डा साधारणत: सात ते आठ फुटापर्यंत खोल गेलेला होता.

माणकेश्वर (जि. उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरले. त्यात बुडून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील माणकेश्वर येथे गुरुवारी दुपारी घडली आहे. ( Two labors drowned due to the rapid filling of dirty water in the pit) 

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ८ जुलै रोजी दुपारी संदीप भाऊ माळी यांच्या घरी शौचालयाचा शोषखड्डा खोदण्याचे काम सुरू होते. पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. हा नवीन खड्डा साधारणत: सात ते आठ फुटापर्यंत खोल गेलेला होता. उर्वरित काम करीत असतानाच शेजारील शौचालयाचा जुना खड्डा कोठे आहे, याचा अंदाज न आल्याने त्यास धक्का लागून तो फुटला. त्यामुळे जुन्या खड्ड्यातील घाण पाणी, माती हे नवीन खड्ड्यात वेगाने उतरले. यावेळी नवीन खड्ड्यात काम करीत असलेले मजूर रघुनाथ रनदिल हे पाण्यात पूर्णत: बुडाले. त्यांना कामात मदत करणारे संदीप बाळू माळी हे रघुनाथ रनदिल यांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र, ते खड्ड्यात फसले. 

हे पाहून त्यांचे लहान भाऊ अमोल बाळू माळी हे मदतीसाठी खड्ड्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडाले. या घटनेत रघुनाथ रनदिल व अमोल माळी यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच काही नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. मयत मजूर रघुनाथ रनदिल (५७) यांना तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. तर दुसरे मयत अमोल माळी (३१) यांना ३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने माणकेश्वर गावात हळहळ व्यक्त झाली.

वाचविण्यासाठी गेलेला एक जण वाचला...मजूरकाम करीत असलेले रघुनाथ रनदिल हे पाण्याखाली गेल्याचे पाहून संदीप माळी हे खड्ड्यातील पाण्यात उतरले. मात्र, ते अर्ध्यातच फसल्याने डोके वर राहिले. मात्र, दुर्गंधीने ते बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच संदीप यांचे भाऊ अमोल माळी यांनी दोघांनाही वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, लागलीच तेही या पाण्यात बुडून खाली गेले. ही घटना कळताच नागरिकांनी जेसीबी आणून सर्वांना बाहेर काढले. तेव्हा रघुनाथ व अमोल हे मृत झाले होते. तर संदीप हे काही वेळाने शुद्धीवर आले.

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद