शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

धक्कादायक ! पालिकेच्या कचरा डेपोत आढळली दोन मृत अर्भके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:14 IST

दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळली.

ठळक मुद्दे एका अर्भकाचे शीरच शरीरावर नसल्याचे आढळले. साधारणत: तीन महिने या अर्भकांचे वय असल्याचा अंदाज आहे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : येथील नळदुर्ग रोडलगत असलेल्या पालिकेच्या कचरा डेपोत दोन मृतावस्थेतील अर्भके आढळली आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडलगत असलेल्या नगरपालिका कचरा डेपोत दोन अर्भकांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळली. यातील एका अर्भकाचे शीरच शरीरावर नसल्याचे आढळले. साधारणत: तीन महिने या अर्भकांचे वय असल्याचा अंदाज आहे.

शिवाय, अर्भकांचे लिंगनिदानही होऊ शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोन्ही अर्भकांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. येथे मृतदेहाचे नमुने घेऊन ते सोलापूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी नगरपालिका कर्मचारी दत्तात्रय साळुंके यांच्या फिर्यादीवरून दोन अर्भक मृतदेहांची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी कलम ३१८ प्रमाणे अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृतावस्थेत आढळलेली अर्भके नेमकी कोणाची, कचरा डेपोत ती कोणी पुरली, या प्रश्नांची उत्तरे पोलीस आता शोधत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद